मुरूड, ता. ७ (बातमीदार) ः मुरूड तालुका सुपारी संघाच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत एकता परिवर्तन पॅनलने सत्ताधारी पॅनलला धूळ चारत दणदणीत विजय मिळवला. कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय असलेल्या सुपारी संघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. प्रचाराची शिकस्त दोन्ही गटाने केली होती.
नियोजनबद्ध प्रचार पद्धतीमुळे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर व शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सहचिटणीस मनोज भगत व भाजपचे सुधीर पाटील यांनी निवडणुकीत आपला करिष्मा दाखवला. अनेक वर्षे अध्यक्षपद भूषविलेले अविनाश (बाबा) दांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक परिवर्तन पॅनेलने जिंकली.
प्रामाणिक पॅनलतर्फे मुरूड तालुका शिंदे गटाचे शिवसेना प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर तसेच सुपारी संघाचे विद्यमान अध्यक्ष महेश भगत, माजी नगरसेवक संजय गुंजाळ या दिग्गजांना पराभव पत्करावा लागला. निवडणुकीपूर्वी सहा सदस्य बिनविरोध निवडून आले होते. ११ पैकी १० सदस्य एकता परिवर्तन पॅनलने जिंकून पूर्ण बहुमत सिद्ध केले. इतर मागास प्रवर्गातून प्रवीण चौलकर विरुद्ध विद्यमान अध्यक्ष महेश भगत यांच्या सरळ लढत झाली. यामध्ये प्रवीण चौलकर यांनी ४२४ मते मिळवत भगत यांचा पराभव केला.
मुरूड शहरातून सात उमेदवार निवडून द्यावयाचे होते. निवडणूक आलेले सातही उमेदवार परिवर्तन पॅनलचे आहेत. अविनाश (बाबा) दांडेकर, अविनाश भगत, जनार्दन कंधारे, अमोल उपाध्ये, विनोद भगत, प्रकाश रणदिवे, हिफाजू रहेमान दर्जी हे विजयी झाले आहेत. दर्जी व संजय गुंजाळ यांना सम-समान मते मिळाली होती. त्यावर साहायक निंबंधक श्रीकांत पाटील यांनी चिठी काढून दर्जी यांना विजयी घोषित केले.
विमुक्त भटक्या जाती व विशेष मागास वर्ग प्रजातीमधून विकास दिवेकर यांना ३९१ मते मिळाली तर नथुराम महाडिक यांना ३,४३३ मते मिळाली. अनुसूचित जाती जमातीमधून प्रामाणिक कार्यतत्पर पॅनेलचे डॉ. अमित बेनकर यांना ३६९ मते मिळाली तर श्रीकांत नांदगावकर याना ३६७ मते मिळाली.
मुरूड ः विजयी घोषित होताच परिवर्तन पॅनलने जल्लोष केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.