महाशिवरात्रीपूर्वी सजला रताळ्यांचा बाजार
मुरूड, ता. १६ (बातमीदार) ः महाशिवरात्रीनिमित्त तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वच शिवमंदिर परिसरात साफसफाई, रंगरंगोटी, रोषणाई करण्यात येत आहे. या दिवशी बहुतांश शिवभक्तांचा उपवास असतो. उपवासासाठी आवर्जून मागणी असणाऱ्या रताळ्यांचे तालुक्यातील कोर्लई येथे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. ही रताळी चविष्ट, पौष्टिक असल्याने ग्राहकांकडून मागणी असते. मुरूडच्या बाजारात सध्या कोर्लईची रताळी दाखल झाली आहेत. मात्र यंदा पाऊस अधिक पडल्याने रताळ्याच्या उत्पादनावर काहीसा परिणाम झाला आहे.
कोकण किनारपट्टीवर पोर्तुगिजांचे वंशज पारंपरिक पद्धतीने रताळ्यांचे मळे पिकवितात. रायगड जिल्ह्यात रताळ्यांची सर्वाधिक उलाढाल मुरुडमध्ये होते. नोव्हेंबरमध्ये रताळ्याची लागवड केली जाते. साधारण अडीच महिन्यांचे हे पीक असते. या वर्षी पावसाचे प्रमाण अधिक असल्याने जमिनीत ओलावा होता, त्यामुळे लागवडीस उशीर झाला. त्या यंदा महाशिवरात्र दहा दिवस आधी आली.
कोर्लईच्या गावठी रताळ्याचे वाण रंगाने लाल चुटूक व खायला गोड असते. उत्पादन घटल्याने यंदा प्रति किलो लहान आकाराची रताळी ५० रुपये तर मोठ्या आकाराची रताळी ६० रु दराने विक्री होत आहे.
रताळी लागवडीच्या कालावधीत पावसाने उघडीप दिली नाही. जमीन ओली राहिल्याने उत्पादनावर परिणाम झाला असून बाजारात आवक घटली आहे.
- अंजलीन लुबीन, बचत गट प्रमुख, मुरूड
कोर्लईतून गतवर्षी साधारण ७० ते ५ महिला विक्रेत्यांनी पाच ते सहा क्विंटल रताळी विक्रीसाठी आणली होती. या वर्षी ३५ ते ४० महिलांकडे तीन ते चार क्विंटल रताळी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मुरूड नगरपरिषदेतर्फे मोठा मंडप बाजारात भरवला जात असून स्थानिकांसह पर्यटक याठिकाणी रताळी खरेदी करण्यासाठी आवर्जून येतात.
- मारिना मार्तीस, विक्रेती
सोबत - फोटो रायगड टुडे वर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.