मुंबई

मुरुडचे पर्यटन पूर्वपदावर

CD

मुरूडचे पर्यटन पूर्वपदावर
किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी; व्यावसायिक सुखावले
मुरूड, ता. ११ (बातमीदार) ः मे महिन्याचा उकाडा आणि निवडणुका यामुळे मुरूडमध्ये महिनाभर पर्यटक रोडावले होते. पर्यटन थंडावल्याने पर्यटनपूरक व्यवसायावर परिणाम दिसू लागला होता; परंतु गेल्या काही दिवसांपासून पर्यटकांची संख्या वाढू लागल्याने व्यावसायिकांनी समाधान व्‍यक्‍त केले आहे.
गेल्‍या काही वर्षापासून कोकणात पर्यटकांचा राबता वाढला आहे. सोशल मीडियामुळे कोकणातील अनेक समुद्र किनारे आता जगासमोर आली आहेत. त्‍यामुळे येथील पर्यटन व्‍यवसायाची उलाढाल वर्षाला कोट्यवधींच्‍या घरात जात आहे. यामध्ये मुरूड, अलिबाग, काशीद आदी समुद्र किनारे सुट्टीच्या दिवसांत बहरून जात आहेत. मात्र यंदा सुट्टीच्‍या काळात येथील समुद्रकिनारे ओस पडलेले दिसून येत होते. यंदाची वाढती उष्मा आणि लोकसभा निवडणूक यामुळे पर्यटकांनी कमी प्रमाणात हजेरी लावली होती. मात्र आता निवडणुकीचे बरेच टप्पे पार पडले असून संध्याकाळनंतर ढगाळ वातावरण असते. त्‍यामुळे मागील चार-पाच दिवसांपासून पर्यटकांनी मुरूड, अलिबाग येथील समुद्रकिनाऱ्यावर हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. नुकतीच मुरूड येथील किनाऱ्यावर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली आहे. समुद्र किनाऱ्यावरील घोडा गाडी, घोडेस्वारी तसेच वॉटर स्पोर्टसकडे पर्यटकांनी आपला मोर्चा वळवला आहे. तसेच गोडी व ताजी माडी पेय देखील येथील माडी दुकानांवर मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येते. त्‍याला पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती देण्यात येत आहे. नारळ पाण्याच्या स्टॉल्सवर, तसेच हातगाड्यांवरील भेळपुरी, पाणीपुरी, चायनीजवर खवय्यांची गर्दी होत आहे. विशेष बाब म्हणजे मासळी मार्केटमध्ये कोळंबी, चिंबोरी, सुरमई आदी मासळीसोबत सुक्की मासळी खरेदी करताना विशेषतः महिला पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे. लॉजिंग, बोर्डिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर बुकिंग सुरू झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
.....................
मुरूड नगर परिषदेच्या माध्यमातून किनारा सुशोभीकरणाचे काम हाती घेतले असून दोनशेहून अधिक वाहनांची समुद्र किनारी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्‍यामुळे पर्यटकांकडून समाधान व्‍यक्‍त करण्यात येत आहे. तसेच समुद्रकिनारी स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. ऐतिहासिक जंजिरा हे पर्यटकांचे खास आकर्षण. त्‍यामुळे यंदा किल्ल्यावरही पर्यटकांचे प्रमाण वाढत आहे.
........................
मार्चमधील परीक्षा तर एप्रिलच्‍या उष्म्यामुळे व्यवसाय मंदावला होता; परंतु मागील काही दिवसांपासून शुक्रवार व शनिवार बुकिंग वाढत आहे.
- हिरा बैले, साईगौरी कॉटेज, व्‍यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT