मुंबई

म्‍हसळ्यात आरटीओकडून कारवाईमध्ये दुजाभाव

CD

म्‍हसळ्यात आरटीओकडून कारवाईमध्ये दुजाभाव
माजी सभापती महादेव पाटील यांची खासदारांकडे तक्रार
म्हसळा, ता. १ (बातमीदार) ः म्हसळा, श्रीवर्धन तालुक्यातील स्थानिक व्‍यावसायिकांच्या गाड्यांवर आरटीओकडून कारवाई करण्यात येत आहे, मात्र श्रीवर्धन तालुक्यात उत्खनन करण्यात येत असलेल्या मायनिंगमिश्रित मातीची (बॉक्स साइड) वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांवर पेण आरटीओ कार्यालयाकडून योग्य ती कारवाई होत नसल्याची तक्रार म्हसळा तालुका माजी सभापती महादेव पाटील यांनी केली आहे. नुकतेच याप्रकरणी त्‍यांनी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे याप्रकरणी लेखी पत्र दिले आहे.
म्हसळा, श्रीवर्धन तालुक्यात मोठ्या प्रमाणावर छोटे-मोठ्या व्‍यावसायिकांची संख्या सर्वाधिक आहे, मात्र त्‍यांच्या वाहनांवर येथील आरटीओकडून अनेक त्रुटी दाखवत सर्रास कारवाई केली जाते, मात्र तोच न्याय श्रीवर्धन तालुक्यात उत्खनन करण्यात येत असलेल्या मायनिंगअंतर्गत मातीमिश्रित (बॉक्स साइड) वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांवर दिसून येत नाही. त्‍यांच्‍याकडे पेण आरटीओकडून दुर्लक्ष केले जात असल्याने अन्‍य वाहतूकदारांकडून रोष व्‍यक्‍त केला जात आहे. म्हसळा, श्रीवर्धनमधील राज्य व राष्ट्रीय मार्गावर मागील दोन महिन्यांत मायनिंग वाहतूक करणाऱ्या अनेक अवजड वाहनांचे अपघात झाले आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात वित्त व मनुष्यहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत, मात्र तरीदेखील आरटीओ अधिकारी या वाहनांवर कोणतीही ठोस कारवाई करताना दिसून येत नाही. यामधील अनेक वाहनांची वाहतूक क्षमता व मुदत संपली (स्क्रॅप) असताना, त्‍या रस्‍त्‍यावर बिनदिक्‍कत धावत आहेत, मात्र या गाड्यांवर आरटीओ अधिकारी कारवाई करताना दिसून येत नाहीत. याप्रकरणी म्हसळा तालुका माजी सभापती महादेव पाटील यांनी थेट खासदार सुनील तटकरे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT