म्हसळ्यात अवैध गोवंश कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा
सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त
म्हसळा, ता. ९ (बातमीदार) ः तालुक्यातील वरवठणे येथे घरातच बेकायदेशीररीत्या गोवंशाची कत्तल सुरू असताना म्हसळा पोलिसांनी धडक करत छापा टाकला. रविवारी (ता. ८) टाकलेल्या या छाप्यात पोलिसांनी ७० किलो गोवंश मास, वाहने आणि कत्तलीसाठी वापरलेली हत्यारे असा एकूण एक लाख ३५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यातील एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला आहे.
वरवठणे येथील आरोपी नियाज महामुद तालीब याच्या राहत्या घरात गोवंशाची कत्तल सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे म्हसळा पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई अक्षय पुरी यांच्यासह पथकाने घटनास्थळी छापा टाकला. पोलिसांना पाहताच आरोपींनी धावाधाव सुरु केली. यात दोघांना पकडण्यात पोलिसांनी यश आले असून तिसरा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला.
याप्रकरणी नियाज महमुद तालीब (वय ४२), मेहफूज किफायती तालीब (वय २०) व तिसरा एका अज्ञात व्यक्तीवर विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास म्हसळा पोलिस ठाण्याचे सहपोलिस निरिक्षक रवींद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली एस. पी. रोहिणकर करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.