मुंबई

चार्जिंग केंद्रावर झाड कोसळले

CD

माथेरान, ता. २ (बातमीदार) ः शहरात दोन दिवसांपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. बुधवारी पहाटे ई-रिक्षा चार्जिंग केंद्रावर झाड कोसळण्याची घटना घडली असून, यात दोन रिक्षांचे मोठे नुकसान झाले. महिनाभरातील झाड कोसळण्याची ही तिसरी घटना आहे.

माथेरानमध्ये प्रायोगिक तत्त्वावर २० ई-रिक्षा सेवा देत आहेत. त्यातील १५ रिक्षा शालेय विद्यार्थ्यांसाठी, तर पाच रिक्षा रुग्ण, सर्वसामान्य नागरिक आणि पर्यटकांच्या सेवेसाठी सुरू आहेत. बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास पाऊस सुरू असताना नगरपालिकेने तयार केलेल्या ई-रिक्षा चार्जिंग केंद्रावर महाकाय झाडाची फांदी पडली. या घटनेत प्रकाश सुतार यांची पाच क्रमांकाची तर कविता बल्लाळ यांच्या सात क्रमांकाच्या ई-रिक्षाचे मोठे नुकसान झाले. पहाटेची वेळ असल्यामुळे कोणीही विद्यार्थी, पर्यटक किंवा चालक नसल्यामुळे जीवितहानी टळली.

महिनाभरात तीन झाडांची पडझड
माथेरानमध्ये ३० जूनपर्यंत १२१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर एक-दोनवेळा अतिवृष्टीही झाली. याच वेळेत दस्तुरी वाहनतळ येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी चारचाकी वाहनांवर झाडे पडल्याची घटना याआधी घडल्‍या असून, बुधवारी ई-रिक्षावर झाड पडल्‍याने प्रवासी वाहतुकीत अडथळे येण्याची शक्‍यता आहे.

जमिनीची धूप थांबवणे गरजेचे
माथेरान हे चढ-उतारावर असलेले शहर असल्‍याने अतिवृष्‍टी झाली तरी पाण्याचा त्‍वरित निचरा होतो, मात्र त्‍याचबरोबरच जमिनीची धूपही मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे १०० ते २०० वर्षे जुनी झाडे उन्मळून पडत आहेत. जर मृद संधारणावर वेळीच काम केले नाही, तर माथ्यावरील रान नष्ट होण्याची शक्‍यता स्‍थानिकांकडून वर्तवण्यात येत आहे.

ई-रिक्षा उभ्या असलेल्या चार्जिंग केंद्रावर अचानक झाड पडले. त्यात दोन रिक्षांचे खूप नुकसान झाले आहे. अगोदरच दोन ते तीन ई-रिक्षा देखभाल-दुरुस्‍तीसाठी माथेरानबाहेर आहेत. आता आणखी दोन रिक्षांचे नुकसान झाले आहे. २० रिक्षांपैकी १५ रिक्षा शालेय विद्यार्थ्यांना, तर पाच रिक्षा रुग्ण व नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्‍ध असतात. आता पाच रिक्षा दुरुस्‍तीसाठी गेल्यामुळे रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांचे हाल होणार आहेत. त्‍यामुळे नगरपालिकेने प्रायोगिक तत्त्वासाठी घेतलेल्या रिक्षा देऊन ही पोकळी भरून काढली, तर माथेरानमधील सेवा सुरळीत सुरू राहील.
- सुनील शिंदे, याचिकाकर्ते तसेच सचिव श्रमिक हातरीक्षा चालक-मालक सेवा संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT