मुंबई

नगरपालिकेने वीजबिल न भरल्यामुळे महावितरण कडून पथदिव्यांची वीज खंडित,पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणाचा फटका स्थानिक व पर्यटकांना

CD

पालिकेच्या कामचुकारपणाचा ग्रामस्थांना दंड
नगरपालिकेने वीजबिल न भरल्यामुळे महावितरणकडून पथदिव्यांची वीज खंडित
माथेरान, ता. २७ (बातमीदार) ः पालिकेचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. माथेरान नगरपलिकेकडून वीजबिल थकबाकी न भरल्यामुळे महावितरणने मुख्य रस्त्यांवरील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. याबाबत स्थानिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
नगरपालिकेकडून ऑगस्ट महिन्याचे २८ लाख ३८ हजार १८० रुपये पथदिव्यांचे वीजबिल प्रलंबित आहे. १७ सप्टेंबरला महावितरणने नगरपालिकेला वीजबिल भरण्याबाबत सूचित केले होते. पण नगरपालिकेकडून कोणतेही उत्तर आले नसल्याने आणि वीजबिल भरले नसल्याने महावितरणने महात्मा गांधी रस्त्यावरील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्यांवर अंधार पसरलेला असतो. या अंधारात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचा पाय मुरगळून इजा होत आहे. तसेच या भागात चोरांचा सुळसुळाटही वाढला आहे.
पालिकेने मागील काही महिन्यांपासून जीईएम पोर्टलवरून लाखो रुपयांच्या वस्तू खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. कर स्वरूपात आलेला पैसा पालिका गरज नसताना खर्च करीत आहे, पण लोकांच्या मूलभूत गरजा पुरविण्यात पालिका प्रशासन कमी पडत आहे. कोणीही अधिकारी आपल्या सरकारी निवासस्थानात राहत नसल्यामुळे येथील लोकांना कोणत्या परिस्थितीशी सामना करावा लागतो याचे कोणतेही सोयरसुतक या अधिकाऱ्यांना नाही. त्यामुळे येथील स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.

पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित होण्याला मुख्याधिकारी आणि लेखापाल जबाबदार आहेत. हे दोघेही शासकीय निवासस्थानात राहत नसून, माथेरान शहराच्या बाहेर राहतात. त्यामुळे येथील लोकांना कोणत्या परिस्थितीशी सामना करावा लागतो याचे काहीच देणेघेणे नाही. लोकांना अंधारातून चालणे जिकिरीचे झाले आहे. त्यात रस्त्यांना खड्डे पडल्याने पाय मुरगळून दुखापत होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे नगरपालिकेने लवकरात लवकर हे पथदिवे पूर्ववत करावे अन्यथा मोठे जनआंदोलन उभारावे लागेल.
- संतोष कदम, शहराध्यक्ष, मनसे

माथेरानमधील एकूण ५१ कनेक्शन असून, त्यातील काही बंद अवस्थेत आहेत. तर काही एमएमआरडीएकडे असल्याने ती बिले नगरपालिकेने का भरावीत? आता १० लाख २९ हजारांचा चेक महावितरणला दिला आहे. याबाबत २४ सप्टेंबर रोजी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन लावला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. कालच वीजबिल भरून वीजपुरवठा पूर्ववत झाला असता.
- भारत पाटील, लेखापाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khokya Bhosle: खोक्या भोसलेवर आता 'एमपीडीए'अंतर्गत कारवाई; जामीन मिळताच हर्सूल कारगृहात रवानगी

Asia Cup 2025 Final: भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार, पाकिस्तानविरुद्ध मॅच विनर खेळाडू मैदानात उतरवणार

Nilesh Ghaiwal: कुख्यात गुंड निलेश घायवळने 'पासपोर्ट'साठी दिला अहिल्यानगरचा पत्ता; पोलिस येणार अडचणीत

Madha News : अडाणी बापलेकांनी स्वतः दोन दिवस कोणत्याही निवाऱ्याशिवाय पावसात थांबून सुमारे २०० जनावरांचे वाचवले जीव

PMRDA DP Issue : पीएमआरडीएचा डीपी रद्द; राज्य शासनाने काढली अधिसूचना

SCROLL FOR NEXT