मुंबई

ठाण्‍यात रक्‍तदान शिबिराची परंपरा कायम

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी संपूर्ण जग जल्‍लोष करत असतानाच ठाण्यात मात्र दरवर्षीप्रमाणे रक्तदानाचा अनोखा उपक्रम सुरू होता. २८ वर्षांपूर्वी शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख दिवंगत आनंद दिघे यांनी सुरू केलेली ही परंपरा जपत यंदाही तितक्याच उत्साहाने हे रक्तदान शिबिर झाले. विशेष म्हणजे ठाणेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उपक्रमाला नुसतीच भेट दिली नाही तर रक्तदानही करत आदर्श निर्माण केला. दरम्यान या उपक्रमामध्ये ४३५ बॅग रक्त संकलित झाले आहे.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या संकल्पनेतून ३१ डिसेंबरला दरवर्षी आनंदाश्रम सेवा संस्थान आणि रक्तानंद संस्था यांच्या मध्यमातून मध्यरात्री रक्तदान करून नवीन वर्षाची सुरुवात होते. यावर्षीही शिवाजी मैदान येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी महापौर आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के, शहरप्रमुख हेमंत पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनीही रक्तदान करत ठाणेकरांना प्रोत्साहित केले. यावेळी ४३५ बॅग रक्त संकलित झाले. दरम्यान रक्तदान करणाऱ्या दात्यांचा यावेळी रक्तकर्ण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
-----------------------
हे जीवनदानच : मुख्यमंत्री
रक्तदान हे जीवनदान आहे. म्हणूनच या उपक्रमाला महत्त्‍व आहे. लोक वेगवेगळ्या पद्धतीने ३१ डिसेंबर साजरा करतात. पण रक्तदान करून सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत करणारा हा एकमेव उपक्रम असेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोटात जोराची कळ, हायवेवर शौचालय दिसेना, गाडी पळवल्यानं मलाच ४ वेळा दंड झाला; न्यायमूर्तींनी NHAIला फटकारलं

BJP MLA: पाणी प्रश्नावर आवाज उठवला तर BJP आमदाराने थेट पायच तोडले... नेमकं काय घडलं? अजून एकालाही अटक नाही

Latest Marathi News Updates : शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन

Maharashtra Rain: पुढील तीन दिवस महत्त्वाचे! मुसळधारेसह भरतीचा इशारा; हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Pune News : सदनिकाधारक, भाडेकरूंना मोठा दिलासा; भाडेतत्त्वावर दिलेल्या सदनिकांवर अतिरिक्त सेवा शुल्क आकारता येणार नाही

SCROLL FOR NEXT