मुंबई

कोसळलेल्या पुलाच्या जागी नवा पूल उभा करण्यासाठी पावणेदोन कोटी रुपयांचा मुलामा

CD

वज्रेश्वरी, ता. १७ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील पिळंझे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या भवरपाडा ते नंबर पाडा दरम्यानचा पूल सुमारे चार वर्षांपूर्वी कोसळला. त्यानंतर काही काळातच तेथील जोडरस्ता वाहून गेला. त्यामुळे याच ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने तब्बल एक कोटी ७२ लाख रुपये खर्चून नवा पूल उभारला. त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
पिळंझे ही आदिवासी विकास क्षेत्र (पेसा) अंतर्गत येणारी ग्रुप ग्रामपंचायत असून यामध्ये पिळंझे बु, पिळंझे ब, देपोली, साखरोली या महसुली गावांसह सुमारे १६ आदिवासी पाडे आहेत. या ठिकाणी भवरपाडा ते नंबरपाडा दरम्यान ओहोळ असून, त्यावर बांधलेला पूल २०१८ मध्ये कोसळला होता. त्यानंतरच्या काळात या पुलाचा जोडरस्ता वाहून गेला. या ठिकाणी पूल व जोडरस्ता तयार करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निविदा मागविण्यात आली. यामध्ये विवेक पवार यांना एक कोटी ६८ लाख ६४ हजार ९३१ रुपयांची निविदा मंजूर करून काम सोपविण्‍यात आले. या पुलाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, बांधकाम काँक्रीट कामासाठी रेतीऐवजी चक्क फेकून देण्यालायक असलेली स्टोन ग्रीड पावडर वापरण्यात आली असल्याचा आरोप सरपंच संतोषी विनोद अघडा यांनी केला आहे.
-------------------------------------------
ठेकेदाराची मनमानी
वास्तविक पाहता दोन वेळा सरकारच्या कोट्यवधी रुपयांची माती झाली असताना पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. त्यावर लक्ष ठेवण्याची गरज सार्वजनिक बांधकाम विभागास वाटली नाही का, हा प्रश्‍‍न आहे. या पुलाचे बांधकाम तकलादू असून सुरुवातीपासूनच बांधकाम विभाग याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहे. जोडरस्त्याच्या कामात काँक्रीट भिंत उभारण्याचे नमूद असताना तेथे दगडाचा वापर ठेकेदाराने केला. याबाबत आवाज उठविल्‍यानंतर ठेकेदाराने ती भिंत तोडून नवी संरक्षक भिंत उभारणीचे काम सुरू केल्याची माहिती उपसरपंच किशोर पाटील यांनी दिली.
-------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ambabai Temple : भाविकांसाठी दिलासा! अंबाबाई मंदिर परिसरातील भूसंपादन होणार, पार्किंग, दर्शन मंडप जागाही बदलणार; १४३ कोटी मंजूर

Latest Marathi News Live Update : अमरावती महानगरपालिकेचा नवा फॉर्म्युला अखेर मंजूर

Navneet Rana: नवनीत राणा यांना पुन्हा धमकी;अमरावतीच्या राजापेठ ठाण्यात गुन्हा , अन्यथा बाबा सिद्धीकी सारखा त्रास देऊ..

Udayagiri Violence : मशिदीजवळ क्रिकेटच्या वादातून तरुणांमध्ये जोरदार हाणामारी; हातात काठ्या घेऊन तरुण उतरले रस्त्यावर.., क्षणात वाद पेटला अन्...

Noida Techie Death : 20 फूट खड्ड्यात कार कोसळून तरुणाचा मृत्यू; योगींनी CEO ला हटवले, SIT चौकशीचे आदेश

SCROLL FOR NEXT