मुंबई

मुंबईतील हवा शुद्धीकरणासाठी पाच एअर प्युरिफायर

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मुंबई महानगरातील प्रदूषणाचे प्रमाण घटण्यासाठी दिल्लीप्रमाणेच पाच ठिकाणी हवा शुद्धीकरण यंत्रे (एअर प्युरिफायर) लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त आय. एस. चहल यांना दिले आहेत. मुंबईत लागणाऱ्या या यंत्रांसाठी सुमारे १० कोटींचा खर्च महापालिकेकडून करण्यात येणार आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून ही उपकरणे लावण्यात येणार आहेत.

मुंबईतील प्रदूषण नियंत्रण आणि हवेची गुणवत्ता नियंत्रित राहण्यासाठी दिल्ली, गुरुग्राम, लखनौप्रमाणे एअर प्युरिफायर टॉवर बसवण्यात येणार आहेत. महानगरातील महापालिकेच्या शाळेत कौशल्य विकास केंद्र सुरू करणे, महापालिका प्रशासनात पारदर्शकता आणि शहराचे सौंदर्यीकरण या विषयांचा अंतर्भाव मुंबई महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात करावा. मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेतानाच त्यांना सुशासनाचा अनुभव यावा, यासाठी विविध मुद्द्यांचा आणि उपाययोजनांचा समावेश करण्यात यावा, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना सांगितले आहे. त्याचबरोबर शहरी वनीकरण वाढेल, यासाठी उपाययोजना करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या ठिकाणी लागणार यंत्रे
दहिसर टोल नाका, मुलुंड चेकनाका, अमर महाल जंक्शन, वरळी जंक्शन, कलानगर या वाहतूक कोंडी असणाऱ्या पाच ठिकाणी हवा शुद्धीकरण यंत्रे लावण्यात येणार आहेत. सक्शन पंपाच्या साह्याने वातावरणातील प्रदूषित हवा खेचून शुद्ध हवा बाहेर सोडण्याचे काम ही उपकरणे करणार आहेत.

रुग्णांची घरोघरी जाऊन तपासणी
शहरातील सुमारे २७ टक्के नागरिक मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या विकारांनी ग्रस्त आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून त्यांची घरोघरी जाऊन तपासणी करावी, त्यांचा डेटा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभागावर गर्दी होत असल्यामुळे ताण कमी करण्याकरिता खिडक्यांची संख्या वाढवावी. एमआरआय, सीटीस्कॅन आणि निदान केंद्र वाढवण्याच्या, तसेच डायलिसिस केंद्र उभारण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 मधील हकालपट्टीनंतर Mustafizur Rahman च्या मदतीला धावला पाकिस्तान; कवडी भावात PSL मध्ये खेळणार

संतापजनक प्रकार! कृष्णा नदीवरील बंधाऱ्याजवळ आढळला अर्धवट जळालेला मानवी पाय; सांगलीत उडाली खळबळ..

अर्जुन तेंडुलकर-सानिया चंढोक यांच्या लग्नाची तारीख ठरली; सचिन तेंडुलकरचा लेक लवकरच चढणार बोहोल्यावर

Latest Marathi News Live Update : पुण्यासाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

Makar Sankranti Vaan Ideas 2026 : मकस संक्रातीच्या वाणात काय द्यायचं ठरत नाहीये? मकर संक्रांतीसाठी पाहा उपयोगी वस्तूंची लिस्ट

SCROLL FOR NEXT