मुंबई

रक्त कर्करोगासाठी स्टेम सेल प्रत्यारोपणाची संजीवनी

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : दरवर्षी, भारतातील एक लाखाहून अधिक लोकांना रक्ताच्या कर्करोगाचे निदान होते. लहान मुलांच्या कॅन्सरने होणाऱ्या मुत्यूमध्ये रक्ताचा कर्करोग हे प्रमुख कारण आहे. या जीवघेण्या आजारावर ‘स्टेम सेल प्रत्यारोपण’ उपयुक्‍त ठरते, असे मत तज्‍ज्ञांनी व्‍यक्‍त केले आहे.
डीकेएमएस-बीएमएसटी या संस्थेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पॅट्रिकपॉल यांनी सांगितले की, ‘दर पाच मिनिटाला भारतातील एका व्यक्तीला रक्‍ताचा कर्करोग किंवा रक्ताचा विकार झाल्याचे निदान होते. अशा वेळी रुग्णाच्‍या रक्‍ताशी जुळणाऱ्‍या स्टेमसेल दात्याचा शोध ही उपचाराची पहिली सुरुवात असते. स्‍टेमसेल प्रत्यारोपणाच्या सुविधेसाठी जुळणारा दाता शोधण्यात वांशिकता महत्त्वाची भूमिका बजावते. रुग्णांना त्यांच्या स्वतःच्या वंशातील व्यक्ती दाता म्हणून जुळण्याची शक्यता अधिक असते. आमेच लक्ष्य शक्यतितक्या स्टेमसेल दात्याची नोंदणी करण्यावर असल्‍याचे सांगताना आतापर्यंत डीकेएमएस-बीएमएसटीने आतापर्यंत ८० हजारहून अधिक संभाव्य देणगीदारांची नोंदणी केली आहे आणि ७५ रुग्णांना जीवनाची दुसरी संधी मिळवून देण्यात मदत केली असल्‍याचे पॅट्रिकपॉल यांनी नमुद केले.
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्‍या हेमॅटो ऑन्कोलॉजिस्ट, बोन मॅरो ट्रान्सप्लांटतज्ज्ञ डॉ. संतनू सेन यांनी माहिती दिली की, स्टेमसेल नोंदणी अस्थिमज्जा प्रत्यारोपणासाठी संभाव्य स्टेमसेल दात्यांचा स्रोत नोंदणीकृत करून रक्त कर्करोगाच्या रुग्णांना मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

काय आहे स्‍टेमसेल प्रत्यारोपण
स्टेमसेल प्रत्यारोपण म्हणजे अस्थिमज्जा प्रत्यारोपण हा एक असा उपचार आहे जो रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात केल्यास आणि रुग्णाची शारीरिक स्थिती चांगली असल्यास रक्ताचा कर्करोग बरा होऊ शकतो. प्रत्यारोपणाचे यश हे रुग्णासाठी अनुवांशिकता जुळणारा योग्य दाता शोधण्यावर अवलंबून असते. भारतात सर्वात मोठी समस्या अशी आहे की, नोंदणी केलेल्या देणगीदारांची संख्या अजूनही तुलनेने कमी आहे. स्टेमसेल प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रुग्णांसाठी योग्य जुळणी शोधण्याची शक्यता वाढवण्यासाठी रजिस्ट्री त्यांच्या डेटाबेसवर देणगीदारांची संख्या सतत वाढविण्यावर अविरत काम करत आहेत. आणखी एक महत्त्वाची समस्या अशी आहे की, प्रक्रियेबद्दल अतार्किक भीतीमुळे संभाव्य जुळणी पडताळणी झाल्यानंतरही स्टेम सेल (पेशी) दान करण्यास अजूनही तेवढा प्रतिसाद मिळत नाही. स्टेमसेल दाता बनणे ही तुलनेने सोपी आणि सुरक्षित प्रक्रिया आहे आणि यामुळे ल्युकेमियाग्रस्त व्यक्तीच्या जीवनात खूप मोठा सकारात्मक बदल घडवला जाऊ शकतो.

०.०४ टक्‍के भारतीय स्‍टेमसेल दाते
वर्ल्डमॅरो डोनर असोसिएशननुसार, स्टेमसेल डोनर सेंटर्सने केलेल्या नोंदणीनुसार जगभरात ४० दशलक्षाहून अधिक संभाव्य स्‍टेमसेल दाते सूचिबद्ध आहेत, त्यापैकी फक्त ०.०४ टक्‍के भारतीय आहेत. भारतात वैविध्यपूर्ण वांशिकता आहे. समान वांशिक पार्श्वभूमी असलेल्या लोकांमध्ये समान एचएलए ॲलेल्स असण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे संभाव्य दात्‍यांची नोंदणी वाढवण्याची गरज आहे; पण रक्त कर्करोगाचा मोठा धोका असतानाही, भारतात प्रौढ रक्तदात्यांची पुरेशी नोंदणी नाही. याचे कारण स्टेमसेल प्रत्यारोपणाबद्दल जागरूकता नसणे आणि स्टेमसेल दाते बनण्याबद्दलचे अनेक गैरसमज. डेटाबेसमध्‍ये भारतीय दात्यांची संख्‍या वाढवल्यास एचएलए विविधतेच्या माहिती संकलनात भर पडेल. त्यामुळे योग्य जुळणीचा दाता मिळण्याची शक्यता वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : पुण्यात पीएमपीच्या ब्रेकडाऊनमध्ये वाढ, एका महिन्यात २४०० घटना

Health Insurance Updated Rules: आता फक्त २ तास ॲडमिट होऊनही क्लेम करता येणार हेल्थ इन्शुरन्स! जाणून घ्या योजना

Sindhudurg : सोनाली गावडे मृत्यू प्रकरण, ‘ती’ दुसरी छत्री कोणाची? बांदा पोलिसांसमोर गूढ उकलण्याचे आव्हान

Eknath Shinde Delhi Visit : पावसाळी अधिवेशन सुरु असताना एकनाथ शिंदेंचं दिल्ली वारी, अमित शहांसह वरिष्ठ नेत्यांची घेतली भेट, नेमकी काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT