मुंबई

दुसरी वंदे भारत एक्सप्रेस मुंबईत दाखल

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ८ : पहिल्या वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसची चाचणी घाट विभागात यशस्वी पार पडल्यानंतर आता मध्य रेल्वेच्या ताफ्यात दुसरी वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस मंगळवारी (ता. ७) रात्री मुंबईत दाखल झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन्ही गाड्यांना १० फेब्रुवारी रोजी हिरवा झेंडा दाखवून सेवेचे उद्‍घाटन करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)येथील फलाट १८ वर होणाऱ्या या कार्यक्रमाची जोरदार तयारी रेल्वेकडून सुरू आहे.

सीएसएमटी-साईनगर शिर्डी आणि सीएसएमटी-सोलापूर या दोन मार्गांवर वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस धावणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात कसारा आणि लोणावळा या दोन्ही घाटांतून रेल्वे गाड्यांना पुश-पुलसाठी अतिरिक्त इंजिन जोडावे लागते. त्यामुळे मेल-एक्स्प्रेसला अधिक वेळ लागतो. या परिस्थितीत विना पुश-पुलासाठी अतिरिक्त इंजिन न जोडता वंदे भारत एक्स्प्रेस घाटमाथ्यावरून चालवणे कठीण होते; परंतु रेल्वे मंत्रालयाने यावर तोडगा काढत ‘वंदे भारत २.०’ प्रकारातील सातव्या रेल्वेगाडीची इंजिन क्षमता वाढवण्यात आली आहे. त्यामुळे अतिरिक्त इंजिन न जोडताही ही एक्सप्रेस एका दमात घाटमाथा चढत आहे.

या गतीने धावणार
वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस ताशी १८० ते २०० किलोमीटर वेगाने धावू शकते; परंतु घाट विभाग आणि रेल्वे मार्गावरील परिस्थिती लक्षात घेऊन, सीएसएमटी ते कर्जत मार्गावर १०५ किलोमीटर प्रतितास, कर्जत-लोणावळा दरम्यान ५५ किलोमीटर प्रतितास आणि लोणावळा-सोलापूर दरम्यान ११० किलोमीटर प्रतितास या वेगाने ही एक्स्प्रेस चालविण्यास रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे.

सोहळ्यासाठी तयारी
१) दोन्ही वंदे भारत एक्स्प्रेसला शुक्रवारी (ता. १०) हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. या उद्‍घाटन सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे, कॅमेरा सेटअपपासून ते अतिथितींच्या बसण्याची व्यवस्था रेल्वेकडून करण्यात आली आहे.
२) शिवाय वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांची गर्दी दिसावी यासाठी रेल्वे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पहिल्या फेरीतून प्रवास करणाऱ्या सूचना देण्यात आल्या आहे. यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची नोंदणीही सुरू करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Free Electricity: राज्यात सर्वसामान्यांना २५ वर्षे मोफत वीज; १०० युनिटपर्यंत दिलासा, स्मार्ट योजनेसाठी महावितरणचा पुढाकार

Sourav Ganguly Video : महिलांना क्रिकेट खेळण्याची गरज नाही! सौरव गांगुलीचा जुना व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय म्हणाला होता? ऐका...

Success Story: एकाच वेळी मामा भाचे झाले क्लासवन अधिकारी; एमपीएससी परीक्षेत शिर्ल्याच्या मामा भाच्यांची दमदार कामगिरी

Sahyadri Tiger Reserve : सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात चौथ्या वाघावर शिक्कामोर्तब, कुंभार्ली घाटात वाघाचे दर्शन

Winter Body Detox: औषधांची गरज नाही; हिवाळ्यात शरीर डिटॉक्स करण्याचे ५ सोपे उपाय

SCROLL FOR NEXT