मुंबई

प्रफुल्ल पटेलांच्या मालमत्तेवर ईडीची टाच

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ८ : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, खासदार प्रफुल्ल पटेल व त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची मुंबईतील मालमत्ता ईडीने सील केली आहे. ईडीच्या न्यायिक प्राधिकरणाने पटेल यांची जप्त केलेली मालमत्ता योग्य असल्याचे म्हटले आहे. या संदर्भात ईडी लवकरच पुढची कारवाई करणार असल्याचे समजते.

वरळीतील सीजे हाउस इमारतीतील चार मजल्यांची मालमत्ता आतापर्यंत ईडीकडून केलेल्या कारवाईत जप्त करण्यात आली आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या मालकीचे असलेले मजले ईडीने गेल्यावर्षी तात्पुरत्या स्वरूपात जप्त केले होते. ईडीकडून लवकरच पटेल यांना नोटीस पाठवून ही जागा खाली करण्यास सांगितले जाणार असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळाली.

कुख्यात तस्कर व गँगस्टर इक्बाल मिर्ची आणि इतरांविरुद्ध दाखल झालेल्या मनीलॉण्डरिंग प्रकरणात ईडीने याच इमारतीतील इतर दोन मजलेही सील केले आहेत. हे दोन मजले इक्बाल मिर्चीच्या कुटुंबाच्या मालकीचे आहेत. ऑक्टोबर २०१९ मध्ये मनीलॉण्डरिंग प्रकरणात पटेल यांची १२ तासांहून अधिक वेळ चौकशी करण्यात आली होती.

काय आहे प्रकरण?
प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कंपनीने सीजे हाऊस इमारत उभारली आहे. याच भूखंडावर इक्बाल मिर्चीच्या मालकीची काही मालमत्ता होती. इमारत उभी राहिल्यानंतर त्यात इक्बाल मिर्चीच्या कुटुंबीयांना दोन मजले देण्यात आले होते. हे मजलेही ईडीने मागील वर्षी सील केले आहेत. याच प्रकरणात ‘डीएचएफएल’चे वाधवान बंधू कपिल आणि धीरज यांची चौकशी झाली असून कपिल वाधवान अटकेत आहेत; तर धीरज वाधवान यांना जामीन मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayor Reservation Lottery : विजय वडेट्टीवार यांनी नागपूरच्या महापौराचं नाव भाजपआधीच सांगितलं, आरक्षण सोडतीवर घेतला 'हा' आक्षेप

Latest Marathi News Live Update : MIM च्या सहर शेख यांना पोलिसांची समज

राष्ट्रवादीने वडिलांचं तिकीट कापलं, संतापलेल्या मुलानं आमदाराच्या कार्यालयासमोर केली लघुशंका; किळसवाणा प्रकार CCTVत कैद

Kolhapur Mayor Election : कोल्हापूर महापालिका महायुतीचा पहिला महापौर कोण?'हे' आहेत संभाव्य उमेदवार

Mayor Reservation: पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर कोण, सर्वसाधारण खुला जाहीर; राजकीय समीकरणात होणार बदल!

SCROLL FOR NEXT