मुंबई

एनडीआरएफच्या मदतीला आता आपदा मित्र

CD

एनडीआरएफच्या मदतीला आता ‘आपदा मित्र’
कल्याणमध्ये १२२ स्वयंसेवकांनी घेतले प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ९ : तुर्की, सीरिया येथे ओढवलेली नैसर्गिक आपत्ती आपल्या इथे ओढवल्यास एनडीआरएफ टीम येईपर्यंत जखमींना तत्काळ मदत मिळावी, यासाठी गावागावात आपदा मित्रांना प्रशिक्षण देत तयार करण्यात येत आहे. कल्याण येथील १२२ स्वयंसेवकांना बुधवारी (ता. ८) काळा तलाव येथे हे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणामुळे लोकांना आपत्तीच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपदा मित्र आणि आपदा सखी यांची मदत होणार आहे.
परिसरात कोठेही आग लागते, कधी पूर येतो. अशा वेळी एनडीआरएफची टीम तातडीने पोहचत नाही. आपल्याजवळ आपदा मित्र, सखी जर तयार असतील, तर त्या त्या गावातील लोकांना आपत्तीच्या परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी ते तात्काळ मदत देतील. गावातील नागरिक ते जिथे रहात असतात, त्या भागातील लहान-मोठे रस्ते, गल्ल्या माहीत असतात. गावाची भौगोलिक परिस्थिती माहीत असते. या सर्वांची माहिती या आपदा मित्र, सखी यांना माहीत असेल, तर त्याची गावकऱ्यांना व एनडीआरएफच्या टीमलादेखील खूप मोठी मदत होऊ शकते, असे या वेळी स्वयंसेवकांनी सांगितले.

------------------
राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण
आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग मुंबई, एनडीएमए, एसडीएमए तसेच ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या वतीने आपदा मित्र प्रशिक्षण कल्याण काळा तलाव येथे देण्यात आले. याअंतर्गत अग्निशमन दल, गर्दी व्यवस्थापन, बोट रेस्क्यू अशा विविध विषयावर प्रशिक्षण देण्यात आले आहे. कल्याण तालुक्यातील विविध भागांतील पोलिस पाटील, नागरी संरक्षण दल, होमगार्ड, एनसीसीचे विद्यार्थी यात सहभागी होते. राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये मध्ये हे प्रशिक्षण सुरू असून ठाणे जिल्ह्यातून ५०० स्वयंसेवकांना; तर कल्याणमधून १२२ विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिले जात असल्याचे स्वयंसेवक सुहास पवार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

Latest Marathi News Live Update: ''ही माझी शेवटची निवडणूक आहे'', काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य

MI Playoffs Chances : बुडत्या मुंबईचं थालाच्या चेन्नईकडे लक्ष! MI फॅन्स निराश होऊ नका... अजूनही होता येईल क्वालिफाय?

SCROLL FOR NEXT