मुंबई

जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळाव्याचा उत्साह

CD

विक्रमगड, ता. १४ (बातमीदार) : जिल्हा परिषदेच्या कोकणपाडा येथील सेमी इंग्रजी प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या मदतीने विविध प्रकारचे स्टॉल्स लावले होते. यामध्ये शैक्षणिक साहित्य, फळे, फुले, गजरे, भाज्या, रानमेवा, वडापाव, भेळपुरी आदी पदार्थांचा यात समावेश होता. या कार्यक्रमातून मनोरंजनात्मक शिक्षणासोबत मुलांचा प्रत्यक्ष कृतियुक्त सहभागातून त्यांना व्यवहार ज्ञान देण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे कृषी आणि पशुसंवर्धन सभापती संदीप पावडे, वसुरी केंद्राचे केंद्रप्रमुख अनंत सुरोशे, कृषी अधिकारी बी. एस. पाटील, प्रथम फाउंडेशनचे गुरू तिरणकर, उज्ज्वल पातोडे, गोपी कोदे, विप्ला फाऊंडेशनचे प्रशांत गवळी, नामदेव कुरकुटे,कृष्णा राऊत यांनी उपस्थित राहून सहभागी विद्यार्थी, पालक यांना मार्गदर्शन केले. या वेळी केंद्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनी, शाळा व्यवस्थापन समिती कोकणपाडा अध्यक्ष व सर्व सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शाळेच्या मुख्य शिक्षिका विनया विनोद डोहाळे यांनी सर्वांचे आभार मानून या बाल आनंद मेळाव्याची सांगता करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Janhvi Kapoor: मराठी कलाकारांच्या मुस्काडात... गांधी-आंबेडकरांवरील जान्हवीच्या 'त्या' विधानानंतर किरण मानेंची पोस्ट व्हायरल

Loksabha Election 2024 : राजधानीत मोदी विरुद्ध केजरीवाल लढत; दिल्लीत आज मतदान

Bankura Loksabha Election : कम्युनिस्टांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा प्रभाव

Sharad Pawar : दुष्काळाबाबत सरकार गंभीर नाही

SSC HSC : दहावी-बारावीची ग्रेड पद्धत होणार बंद

SCROLL FOR NEXT