मुंबई

खड्डेमुक्तीचा पनवेलकरांना त्रास

CD

पनवेल, ता. १४ (बातमीदार): नवीन पनवेल-माथेरान महामार्गाला जोडणाऱ्या पुलाचे दोन्ही बाजूला काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अशातच आता विचुंबे भुयारी मार्ग देखील बंद करण्यात येणार असल्याने पनवेलकरांचा प्रवास अधिक त्रासदायक ठरणार आहे.
नवीन पनवेल-माथेरान महामार्गाला जोडणाऱ्या या पुलामुळे पनवेल तालुक्यातील नेरे आणि माथेरानकडे जाणारी शेकडो गावे, वाड्या, पाडे जोडली असून दळणवळणाचा हा प्रमुख मार्ग आहे. त्यातच विचुंबे, उसर्लीकडे जाणाऱ्या मार्गावर महाविद्यालये व शाळा असल्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते. या उड्डाणपुलाची दुरवस्था झाल्याने हा उड्डाणपूल खड्डेमुक्त करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पुलावर रास्ता रोको करण्यात आले होते. त्यानंतर नवीन पनवेल उड्डाणपूल आणि एचडीएफसी सर्कल काँक्रिटीकरण करण्यासाठी सिडकोने२ कोटी ४८ रुपये मंजूर करण्यात आले. या कामाची सुरुवात ही दहा दिवसांपूर्वीच झाली आहे. त्यामुळे पनवेलकडे जाणारे वर्दळीचे मार्ग बंद असल्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.
---------------------------------------
रेल्वेमार्ग रुंदीकरणासाठी मार्ग बंद
जेएनपीटी ते वैतरणा सेक्शन फेज -२ या डबल लाईन रेल्वे मार्गाचे काम पनवेल रेल्वेस्टेशन तक्का ते विचुंबे गाव या मार्गावर १३ फेब्रुवारी ते ३० मे पर्यंत सुरू राहणार असल्याने तक्का गाव ते विचुंबेकडे जाणारा भुयारी मार्ग, विचुंबे गाव, नवीन पनवेल ते शिवशंभो नाका मार्ग दोन्ही बाजूच्या वाहतुकीस सोमवार (ता.१३) पासून पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

SCROLL FOR NEXT