मुंबई

चहाडे नाकाजवळ दुचाकी रॅली

CD

मनोर, ता. १९ (बातमीदार) : युवा-शक्ती प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी (ता. १९) मनोर-पालघर रस्त्यावरील चहाडे नाका येथे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. जयंती उत्सव साजरा करण्यासाठी चहाडे नाका येथे तयार केलेल्या देखाव्यात शिवछत्रपतींची प्रतिमा स्थापन करण्यात आली होते. भगवे फेटे परिधान केलेल्या युवकांनी शिवरायांचा जयजयकार करीत शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जयंती उत्सवात पालघर तालुक्याच्या पूर्वेकडील गावांमधील युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
किल्ले वसई मोहीम परिवाराच्या सदस्यांकडून उपस्थित युवकांना शिवाजी महाराजांचे कर्तृत्व, इतिहास आणि गडकिल्ल्यांची माहिती देण्यात आले. पालघर जिल्ह्यातील गडकिल्ले मराठा साम्राज्य आणि इतिहासाची साक्ष देत आहेत. गडकिल्ल्यांवर पर्यटक आणि स्थानिकांकडून मद्यसेवन करून गडकिल्ल्यांचे पावित्र्य नष्ट केले जात आहे. काही मोजके युवक गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि पावित्र्य राखण्यासाठी पुढे येताना दिसत आहेत. शिवराय घराघरात पोहण्यासाठी शिवरायांचे कर्तृत्व समजून घेत इतिहासाची साक्ष देत उभ्या असलेल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धन मोहिमांमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT