सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णाच्या सेवेसाठी उपस्थित असलेल्या नातेवाईकांसाठी जेवणाची विनामूल्य सोय करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेने अक्षय चैतन्य संस्था आणि रिलायन्स फाऊंडेशन यांच्या साथीने हा उपक्रम नुकताच सुरू केला आहे.
कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ठिकठिकाणचे रुग्ण येतात. त्यांना जेवणाची चिंता अधिक त्रासदायक ठरते. त्यातून मार्ग काढण्यासाठी अक्षय चैतन्य संस्थेने पुढाकार घेतला. भायखळा येथील मध्यवर्ती स्वयंपाकगृहात जेवण तयार केले जाते. मग मोठ्या डब्यातून ते संबंधित ठिकाणी पोहोचवले जाते. महापालिकेने त्यांना हॉस्पिटलच्या परिसरातील रात्र निवारा इमारतीत तळमजल्यावर जेवण वाढण्यासाठी जागा दिली आहे. दुपारी १२ ते २ या काळात ही सुविधा उपलब्ध असून, त्याला मिळणाऱ्या प्रतिसादाचा अंदाज घेऊन सायंकाळी ७ ते ९ या काळातही भोजनाची सोय करण्याचा विचार असल्याचे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.
सध्या सरासरी १५० ते २०० नातेवाईक या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यांना हा मोठा दिलासा मिळाला आहे. भात, डाळ, भाजी असे नेहमीचे जेवण असते. सुटीच्या किंवा सणाच्या दिवशी गोड पदार्थाचाही जेवणात समावेश केला जातो. अन्नाची नासाडी होऊ नये, ते वाया जाऊ नये, यासाठी संस्थेचे स्वयंसेवक काळजी घेतात. रुग्णांसोबत येणारे नातेवाईक हे चिंतेने त्रस्त असतात. रुग्णांच्या नातेवाईकांचा ताण हलका करण्यासाठी आयुक्तांनी केलेल्या पाठपुराव्यातून विनामूल्य भोजनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्याशिवाय, रुग्णालय प्रशासनाने त्यांना रात्र निवारा, स्वच्छतागृहे याही सुविधा दिल्या असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक अनिरुद्ध माळगावकर यांनी दिली.
-----------------------------
नातेवाईकांसाठीही विनामूल्य भोजन
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील खिडक्यांवरील रांगा कमी करण्यासाठी जास्तीच्या खिडक्या उघडणे. तपासणी-चाचण्या यांच्यासाठी जास्तीच्या सुविधा देणे. परिसरातील स्वच्छतेला प्राधान्य, नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभागाचे आधुनिकीकरण आदी गोष्टींची सुरुवात बांगर यांनी आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर झाली आहे. नातेवाईकांसाठी विनामूल्य भोजन सुविधेचाही यात समावेश आहे.
...................
लवकरच वाचनालय
एखादी व्यक्ती आजारी पडली तर रुग्णांसहीत नातेवाईकांची तारांबळ उडते. मानसिक ताणतणाव वाढतो. अशावेळी रुग्णांना धीर देण्यासाठी, मानसिक आधार देण्यासाठी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या वेळेचा सदुपयोग व्हावा म्हणून आयुक्त अभिजीत बांगर यांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मोफत वाचनालय सुरू करण्याचे ठरवले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.