मुंबई

स्थानक परिसरात झोपड्यांचे पेव

CD

जुईनगर, ता.२ (बातमीदार)ः नवी मुंबईकरांच्या आरामदायी प्रवासासाठी उभारण्यात आलेल्या रेल्वे स्थानकालगत बेकायदा झोपड्यांचे पेव फुटले आहे. या झोपड्यांमुळे स्थानक परिसराला बकाल स्वरूप आले असून पालिका तसेच सिडकोकडून या बेकायदा झोपड्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने प्रवासी मात्र त्रस्त आहेत.
नेरुळमधील सेक्टर २० मध्ये बुधवारी नवी मुंबई मनपाच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई करत बेकायदा झोपड्या जमीनदोस्त केल्या आहेत. त्यामुळे अतिक्रमण विभागाने जुईनगर तसेच नेरुळ स्थानकालगत असलेल्या बेकायदा झोपड्यांवर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. नेरुळमधील सेक्टर ८ मध्ये गावदेवी मंदिराच्यासमोरील मोकळ्या भूखंडावर कित्येक वर्षांपासून बेकायदा झोपड्या आहेत. याच ठिकाणी रोडवर बेकायदा नर्सरी देखील आहे. तसेच या झोपड्यांच्या शेजारी भंगाराचा व्यवसाय देखील जोमाने सुरू आहे. त्याचप्रमाणे जुईनगर रेल्वे स्टेशन समोर देखील अशाच बेकायदा झोपड्या उभारण्यात आल्या असल्याने संपूर्ण परिसराला बकालपणा आला आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकातील झोपडपट्ट्यांना कोणाचा वरदहस्त आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
-------------------------------------------
जुईनगर रेल्वे स्थानक समोर अलीकडे बेकायदा झोपड्या उभारल्या गेल्या आहेत. याच मार्गे प्रवाशांना ये-जा करावी लागते. त्यामुळे स्थानकालगतच्या या झोपड्यांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या झोपड्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी करणार आहे.
-रंगनाथ औटी, माजी नगरसेवक
----------------------------------
रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या झोपडपट्ट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अनेक वेळा रेल्वे स्थानकांकडे जाणाऱ्या स्रियांना विचित्र प्रसंगांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आयुक्त आणि अतिक्रमण विभागाशी यासंदर्भात बोलणं केले आहे.
विशाल ससाणे, माजी नगरसेवक
---------------------------------------
जुईनगर रेल्वे स्थानकावरून घरी जात असताना बाजूला असलेल्या झोपडपट्यांमधील काही व्यक्ती नशेच्या धुंदीत होती. येणाऱ्या जाणाऱ्यांना शिव्या देत होते, अनेक वेळा प्रवाशांना लुटण्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत.
-अविनाश भालसिंग, प्रवासी
----------------------
नागरिकांना प्रवाशांना होणाऱ्या त्रासाचा विचार करून जुईनगर रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या झोपडपट्ट्यांची तत्काळ पाहणी करून कारवाई केली जाईल.
-भरत धांडे, तुर्भे विभाग अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT