मुंबई

काल्‍हेरची तहान भागणार

CD

भिवंडी, ता. ५ (बातमीदार) : केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथे मंजूर झालेल्या २९ कोटी रुपयांच्या पाणीयोजनेचे भूमिपूजन केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पाटील यांनी गावाला सौर पद्धतीने वीज पुरविण्याच्या प्रकल्पासाठी पुढाकार घेण्‍याचे आवाहन केले.

नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतीपेक्षा काल्हेरची लोकसंख्या दहा पटीने जास्त आहे. या ग्रामपंचायतीकडून अत्यंत कमी काळात वेगाने विकासकामे करण्यात आली. केंद्र सरकारने निश्चित केलेल्‍या शाश्वत विकासाच्या नऊपैकी सहा ते सात उद्दिष्ट्ये काल्हेरवासीयांनी साध्य केली. आता उर्वरित उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील अव्वल ग्रामपंचायतीचा पुरस्कार स्‍वीकारावा. पंतप्रधानांनी ‘एक सूर्य, एक विश्व, एक ग्रीड’ धोरण स्‍वीकारले आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून सौरऊर्जा प्रकल्प बसविल्यास, काल्हेरमधील नागरिकांना स्वस्तात वीज उपलब्ध करता येईल. सध्या विजेचा प्रतियुनिट दर ७ रुपये ६४ पैसे आहे. त्याऐवजी एक रुपया ४६ पैशांत सौर ऊर्जेवरील वीज उपलब्ध होईल. त्या दृष्‍टिकोनातून ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा, अशी सूचना पाटील यांनी केली.

काल्हेरच्या इतिहासात प्रथमच सरकारकडून २९ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. या निधीतून २०५२ पर्यंतच्या लोकसंख्येच्या दृष्‍टिकोनातून पाणीपुरवठ्यासाठी कामे करता येतील. गावाच्या भविष्यासाठी काम दर्जेदार व्हावे, यासाठी पदाधिकारी, ग्रामस्थ आणि प्रशासनाने सतर्क राहावे, असे आवाहन पाटील यांनी केले. काल्हेर गावात आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यावर भर देण्याच्या दृष्‍टिकोनातून आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य केंद्रात रूपांतर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे पाटील यांनी सांगितले.
------------------------
काल्हेरमध्ये स्पोर्ट्स अकादमी सुरू करणार
काल्हेर गावाला खेळांची समृद्ध परंपरा आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून काल्हेरमध्ये स्पोर्ट्स अकादमी मंजूर करण्यात येईल. त्यानुसार गावात खेळांच्या सर्व सुविधा उपलब्ध होतील, अशी घोषणा पाटील यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबादची पॉवरप्लेमध्ये खराब सुरूवात; राजस्थानने दिले दोन धक्के

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT