मुंबई

ट्विटरवर ‘ठाण्यात सरकारी गुंडांचा राजचा डंका’

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : ट्विटरवर ठाण्यातील सरकारी गुंडाराजचा डंका आज दिवसभर पाहायला मिळाला. सुमारे तीन हजारपेक्षा अधिक ट्विटर हँडलरवर या हॅशटॅगने पोस्ट करण्यात आल्या. यामध्ये राजकारणाशी संबंध नसलेल्या ठाणेकरांनीही आपल्या संतप्त भावना व्यक्त करत सरकारी कारभाराचा खरपूस समाचार घेतला. ठाणे शहराशी संबंधित असा हॅशटॅग वायरल होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सत्तांतरानंतर ठाणे हे राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आले आहे. शिवसेनेत दोन गट झाल्यानंतर ठाण्यात सर्वाधिक राजकीय राडे घडले. त्यातून अनेक राजकीय नेत्यांपासून कार्यकत्यांवर गुन्हे दाखल करण्यापासून ते तडीपारीपर्यंत कारवाया करण्यात आल्या. पालिका आणि पोलिस यंत्रणेला हाताशी धरून हा सर्व कारभार सुरू असल्याची चर्चा ठाण्यात उघडपणे सुरू आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या चार राजकीय कार्यकर्त्यांना हद्दपारीच्या कारवाईची नोटीस बजावण्यात आल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांच्या कुटुंबियांची सुपारी देणाऱ्याविरोधात तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याचे सांगितले होते; तर आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला गुंड वावरत असल्याची प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर ‘ठाण्यात सरकारी गुंडांचा राज’ या हॅशटॅगचा ट्रेंड सुरू झाला आहे. विशेष म्हणजे राजकीय संबंध नसलेल्या अनेक जणांनी हाच हॅशटॅग वापरून ट्विट्स केले आहेत. त्यामध्ये स्थानिक पोलिस आणि राज्यकर्त्यांच्या विरोधातील आपला राग व्यक्त केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ठाण्यातील कायदा-सुवस्थेवर टीकात्मक ट्विट्स होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
---
हॅशटॅग चळवळ
‘ठाणे पोलिस कमिशनर, सत्ताधाऱ्यांची गुलामगिरी बस करा, नाही तर निघून जा...’ हॅशटॅग ठाण्यात सरकारी गुंडाराज, अशी चळवळ ट्विटरच्या माध्यमातून सुरू झाली आहे. यामध्ये ‘हर जोर जुल्म के टक्कर में, संघर्ष हमारा नारा है... लढेंगे जितेंगे’, ‘करमुसेलाही पोलिसांनी उचलून आव्हाड यांच्या बंगल्यावर नेले होते,’ अशा अनेक प्रकारच्या प्रतिक्रियाही या ट्विटरवर उमटत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT