मुंबई

हल्ला केल्याप्रकरणी आरोपी निर्दोष

CD

ठाणे, ता. २३ (वार्ताहर) ः हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक असलेल्या आरोपीची बारा वर्षांनंतर निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. एम. गुप्ता यांच्यापुढे ही सुनावणी झाली. सरकारी पक्षाला आरोप सिद्ध करण्यात अपयश आल्याने आणि संशयाचा फायदा देत आरोपीला निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.

अँथोनी राजमानी नागर याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. अँथोनी राजमानी याने १६ मार्च २०११ रोजी तक्रारदारावर विळ्याने हल्ला केल्याचा त्याच्यावर आरोप होता. दोघांमध्ये पार्किंगवरून वाद झाल्याचे सांगण्यात आले होते. पण, तक्रारदाराच्या कुटुंबाव्यतिरिक्त एकही साक्षीदार न्यायालयात हजर झाला नाही. हल्ला केला ते ठिकाण गर्दीचे होते; पण ते पाहणारा एकही साक्षीदार न्यायालयात न आल्याने सबळ पुराव्याअभावी आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT