मुंबई

कोरोना प्रसारात कुलाबा आघाडीवर

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. विशेष करून कुलाबा, ग्रॅंट रोड, अंधेरी या भागांत कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्‍याचे पालिकेतील आकडेवारीततून दिसून आले आहे. दरम्‍यान, रुग्णसंख्येत होत असलेली वाढ लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या तयारीचा वेग वाढवला आहे.
कोरोनाला प्रतिबंध बसावा यासाठी मुंबईत दुबई आणि चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच डॉक्टर, कर्मचारी यांच्यासह रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना रुग्णालयामध्ये मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. पालिकेच्या डॅशबोर्डवर नोंदवल्‍या गेलेल्‍या आकडेवारीनुसार २४ वॉर्डांपैकी १० वॉर्डांमध्‍ये कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.

रुग्णसंख्येत ६९ टक्के वाढ
मुंबईत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत असून जवळपास संपूर्ण मुंबईला कोरोनाचा विळखा बसला आहे. पालिकेच्या २४ पैकी १० वॉर्डांमध्‍ये २५ ते ३१ मार्चदरम्यान कोरोनाबाधित रुग्णसंख्येत ६९ टक्के वाढ झाली आहे. कुलाबा, ग्रँट रोड, परळ, अंधेरी पूर्व व पश्चिम, मालाड, कांदिवली, भांडुप या वॉर्डांमध्‍ये ६५० ते ९४५ बाधित रुग्ण असल्याचे पालिकेच्या ‘डॅशबोर्ड’वर नोंद करण्यात आली आहे.

गंभीर रुग्णसंख्येत घट
कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत असली, तरी गंभीर रुग्णसंख्येत घट आहे; मात्र कोणालाही ताप, खोकला, सर्दी असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत. तसेच कोरोनावर मात केली असली तरी दोन ते तीन दिवस घरात आयसोलेशनमध्ये राहावे, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत असून एप्रिल, मे महिन्यात ही वाढ अधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी मुंबईकरांनी सहकार्य करावे.
- डॉ. मंगला गोमारे, आरोग्य अधिकारी, पालिका

२५ ते ३१ मार्च रुग्ण नोंद
वॉर्ड - रुग्ण
कुलाबा - ५९
ग्रॅंट रोड - ७४
वांद्रे - ९५
अंधेरी पश्चिम - १४६
अंधेरी पूर्व - ४७
कुर्ला - ५८
मालाड - ४६
भांडुप - ४२
परळ - ४२
कांदिवली - ४१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, शेकाप कार्यकर्ते अन् शिवसैनिक भिडले

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT