Sakal Premier Award 2023  sakal
मुंबई

Sakal Premier Award 2023 : दिग्दर्शक राजदत्त, प्रशांत दामले यांचा होणार विशेष सन्मान

ठाण्यात बुधवारी रंगणार ‘सकाळ प्रीमियर अवॉर्ड्स’ सोहळा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : रंगभूमीबरोबरच छोट्या तसेच मोठ्या पडद्यावर अतुलनीय कामगिरीने ठसा उमटवणारे ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व दत्तात्रय अंबादास मायाळू अर्थात ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त आणि गेल्या दोन दशकांहून अधिक काळ मराठी रंगभूमीवर रसिकांचे मनोरंजन करणारे विक्रमादित्य अभिनेते प्रशांत दामले यांना ‘सकाळ प्रीमियर अवॉर्ड्स’ सोहळ्यात विशेष सन्मान पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

‘सकाळ प्रीमियर’ सोहळ्याचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. पहिला प्रीमियर सोहळा मुंबईत पार पडला होता. दुसरा सोहळा पुण्यात रंगला; तर यंदाचा तिसरा ‘सकाळ प्रीमियर अवॉर्ड्स’ सोहळा ठाण्यात होणार आहे. ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात येत्या बुधवारी (ता. १२) ‘सकाळ प्रीमियर अवॉर्ड्स’ सोहळा दिमाखात पार पडणार आहे.

यात मनोरंजन क्षेत्रातील तारे-तारकांसह सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक नामवंत मंडळी आवर्जून उपस्थित राहणार असून, पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स या सोहळ्याचे मुख्य प्रायोजक आहेत. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि अभिनेता पुष्कर श्रोत्री यांचे दमदार सूत्रसंचालन सोहळ्याचे वैशिष्ट्य असेल.

यंदाच्या ‘सकाळ प्रीमियर’ सोहळ्यात अनेक चित्रपटांनी सहभाग घेतला आहे. त्यांच्यात विविध विभागांमध्ये चुरस रंगणार आहे. या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट गीतकार आणि सर्वोत्कृष्ट संकलक आदी पुरस्कारांबरोबरच काही विशेष पुरस्कार दिले जाणार आहेत. नुकतीच प्रीमियर पुरस्कारांची नामांकन यादी जाहीर करण्यात आली. सर्वत्र अंतिम पुरस्कारांबाबतची चर्चा रंगू लागली आहे. चमचमीत विनोद आणि दमदार नृत्याविष्काराने हा पुरस्कार सोहळा अधिक रंगतदार होणार आहे.

पुरस्कारांसाठी जबरदस्त चुरस
वाळवी, मी वसंतराव, चंद्रमुखी, गोष्ट एका पैठणीची, सरसेनापती हंबीरराव, बालभारती आणि धर्मवीर चित्रपटांमध्ये पुरस्कारासाठी जबरदस्त चुरस आहे. स्वप्नील जोशी, जितेंद्र जोशी, प्रसाद ओक, प्रवीण तरडे, अजय पुरकर आणि ललित प्रभाकर यांच्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी; तर सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, सायली संजीव, मुक्ता बर्वे, जिनिलिया देशमुख आणि पूर्वा पवार यांच्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारासाठी स्पर्धा रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election Result 2026 : ठाकरे गटावर दुहेरी आघात ! मुंबईतील सत्ता जाताच काही वेळातच शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदाराचे हृदयविकाराने निधन

Kolhapur Municipal Politics : कोल्हापुरात महायुतीचा पहिला महापौर कोण? नेत्यांकडून नगरसेवकांच्या बैठकीची वेळ तारीख ठरली

मुंबईत मोठा भाऊ झाला छोटा! शिंदेंनी ठाकरेंचे ६२ नगरसेवक फोडले, ९० जागा लढल्या पण जिंकले फक्त २९; स्ट्राइक रेट गंडला

अभि - क्रितिकाच्या केळवणानंतर आता हळदीचा जल्लोष ! ‘लग्नाचा शॉट’ शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला

Shivsena Uddhav Thackeray : ठाकरेंच्या शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’

SCROLL FOR NEXT