मुंबई

दहा दिवसांत १० कोटींची वसुली

CD

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १० : यंदाच्या आर्थिक वर्षात मालमत्ता कर विभागाने मागील वर्षीपेक्षा १०७ कोटी १७ लाख रुपये अधिक उत्पन्न मिळवत उत्पन्नाचा विक्रम प्रस्थापित केला. विशेष म्हणजे ही विक्रमी घोडदौड सुरू असून आर्थिक वर्षाच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये तब्बल दहा कोटी रुपयांची वसुली करून पुन्हा विक्रमी नोंद केली आहे.
महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त तथा मालमत्ताकर विभागाच्या प्रमुख सुजाता ढोले आणि त्यांच्या सहकार्‍यांनी अत्यंत नियोजनबद्ध काम करून उत्पन्नाचे उद्दिष्ट ५७५ कोटींपेक्षा अधिक ६३३ कोटी १७ लाख रुपयांची मालमत्ता करवसुली करण्यापर्यंत झेप घेतली. ३१ मार्च २०२३ या आर्थिक वर्षाच्या अखेरच्या एका दिवसात १८.९२ कोटी इतके उत्पन्न जमा करण्यात आले. हादेखील कररूपी महसूल संकलनाचा विक्रम होता. २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ८०१ कोटी इतके उत्पन्न मालमत्ता करातून जमा होईल, असे उद्दिष्ट महापालिका राजेश नार्वेकर यांनी अंदाजपत्रक सादर करताना मालमत्ता कर विभागापुढे ठेवले आहे. त्या दृष्टीने मालमत्ता कर विभाग नियोजनबद्ध पावले टाकत आहे. याचीच परिणीती म्हणजे एप्रिल महिन्याच्या पहिल्या १० दिवसांत मार्च महिन्यातील करवसुलीची गतिमानता कायम राखत १० कोटी ५० लाख इतके उत्पन्न मालमत्ताकरापोटी जमा झाले आहे.

विकासाला हातभार लावा!
मालमत्ता कराची वसुली प्रभावीपणे करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. मालमत्ता कर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा सर्वात प्रमुख स्रोत असल्याने व करापोटी जमा होणाऱ्या महसुलामधूनच नागरी सेवा सुविधापूर्ती केली जाते. यासाठी नागरिकांनी आपला मालमत्ता कर विहित वेळेत भरून शहर विकासाला हातभार लावावा, असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live: सत्ता कुणाची? महाराष्ट्रातील २९ महापालिकांचे निकाल आज, राजकीय भवितव्य ठरणार

Satara News: सातारा जिल्ह्यातील ७६ गावे चकाचक; ओडीएफ प्लस मॉडेल म्हणून घोषित, अनेक गावांनाही प्रेरणा !

Satara politics: साताऱ्यात राष्‍ट्रवादीच्‍या नेत्‍यांशी पालकमंत्र्यांची खलबते; शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार?, बंद दाराआड काय घडलं?

Municipal Corporation Election Result 2026 : मुंबईचा किंग कोण ? राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज, सत्ता कुणाची याकडे देशाचे लक्ष

Ragi Soup Recipe: वजन कमी करायचंय? मग सकाळी नाश्त्यात झटपट बनवा रागी सुप, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT