मुंबई

ईव्ही बॅटरीच्या इलेक्ट्रोलाईटचा परवाना

CD

मुंबई, ता. १० : जपानच्या मित्सुबिशी केमिकल कॉर्पोरेशनने, इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या बॅटरीसेलसाठी लागणारे इलेक्ट्रोलाईट बनवण्याचा परवाना जगात सर्वप्रथम नियोजेन या भारतीय कंपनीला दिला आहे.

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. हरिन कनानी यांनी आज येथे ही माहिती पत्रकारांना दिली. आतापर्यंत इलेक्ट्रोलाईटची निर्मिती भारतात होत नव्हती. इलेक्ट्रिक वाहन उत्पादक बॅटरी सेल चीनमधून आयात करत होते. मात्र आता या परवान्यामुळे दरवर्षी तीस हजार मेट्रिक टन इलेक्ट्रोलाईट द्रव स्वरूपात बनवण्याचा परवाना या कंपनीला मिळेल. त्यामुळे आपले आयातीवरील अवलंबित्व कमी होईल. तसेच भारतीय मोटार उत्पादकांना आता संपूर्णपणे सुरक्षित स्वदेशी बॅटरी बनवणे शक्य होईल. कारण बॅटरीतील अन्य महत्त्वाचे भाग भारतात बनतात.
या कारखान्याचा आराखडा व रचना मित्सुबिशी करून देणार असून त्यातून २०२५ मध्ये उत्पादन सुरू होईल. तीस हजार मेट्रिक टन इलेक्ट्रोलाईटच्या उत्पादनामुळे ३० गिगावॅट अवर बॅटरीचे उत्पादन भारतात होऊ शकेल, असे कनानी म्हणाले. स्वदेशी बॅटरी निर्मितीसाठी सरकार पीएलआय योजनेनुसार अठरा हजार कोटी रुपये अनुदान देणार आहे. त्यानुसार या क्षेत्रात पंचेचाळीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक भारतात होईल, असेही ते म्हणाले. या प्रकल्पासाठी आम्ही साडेचारशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

---
इलेक्ट्रोलाईटची आयात, निर्यात अशक्य
मित्सुबिशी केमिकल ही इलेक्ट्रोलाईट बनवणारी जगातील आघाडीची कंपनी आहे. त्यांचे प्रकल्प जपानसह फक्त अमेरिका, इंग्लंड व चीनमध्ये असून त्यांनी जगात सर्वप्रथम याच भारतीय कंपनीला इलेक्ट्रोलाईट बनवण्याचा परवाना दिला आहे. इलेक्ट्रोलाईट हे द्रव स्वरूपात असल्याने ते आयात किंवा निर्यात करता येत नाही. त्यामुळे ते फक्त भारतासाठीच वापरले जाईल, असे हरिन कनानी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gopichand Padalkar: एका फोनने भाषाच बदलली! मुख्यमंत्री फडणवीसांचा पडळकरांना फोन, म्हणाले...

Raj Thackeray: पक्षफुटीनंतर पहिल्यांदा राज ठाकरेंचा मनसैनिकांशी संवाद, कानमंत्र देत म्हणाले...

Latest Marathi News Updates : सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-बंगळूरू विमानसेवा 15 ऑक्टोबरपासून सुरु

Who is Sanjog Gupta? पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला फैलावर घेणारे संजोग गुप्ता कोण? जगासमोर शेजाऱ्यांचं पितळ उघडं पाडलं अन् लाज काढली...

Delhi University Election Result : दिल्ली विद्यापीठ निवडणुकीत ‘ABVP’ने पुन्हा एकदा फडकवला भगवा!

SCROLL FOR NEXT