मुंबई

एकपात्री नाट्य स्पर्धेत स्वप्नील पाटील प्रथम

CD

वाडा, ता. १८ (बातमीदार) : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नीलेश सांबरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिजाऊ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पाच दिवस सुरू असणाऱ्या या महोत्सवात नाट्य, नृत्य व गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी झालेल्या एकपात्री खुल्या नाट्य स्पर्धेत वाडा तालुक्यातील स्वप्नील पाटील यांचा प्रथम क्रमांक आला.
स्वप्नील पाटील हे शिक्षक असून तालुक्यातील नाट्य कलाकार, लेखक तथा व्याख्याते म्हणून प्रसिद्ध आहेत. तालुक्याच्या ग्रामीण भागात नाट्य चळवळ सुरू ठेवण्याचे काम करत आहेत. जिजाऊ महोत्सवामध्ये त्यांच्या ‘मी बाप बोलतोय’ या एकपात्री नाट्यप्रयोगाला प्रथम क्रमांक मिळाला. स्पर्धा दोन स्तरावर झाली. निवडक दहा स्पर्धकांची अंतिम स्पर्धेसाठी निवड झाली. यामध्ये पालघर, ठाणे, मुंबई आदी जिल्ह्यातून स्पर्धक सहभागी झाले होते. पारितोषिक वितरणासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये, पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे, पालघर जिल्हा परिषद सदस्य शिवा सांबरे, हबिब शेख, बांधकाम सभापती संदेश ढोणे आदी मान्यवरांसह सामाजिक, राजकीय व कलाक्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT