मुंबई

ठाण्यात आगीच्या चार घटना

CD

ठाणे, ता. २० (वार्ताहर) : ठाणे शहरात बुधवारी (ता. १९) आगीच्या चार घटना समोर आल्या आहेत. सिनेवंडरलगतच्या ओरियन बिझनेस पार्क इमारतीत मंगळवारी (ता. १८) आग लागून अग्निशमन दलाची दमछाक झाली. सुमारे १२ तासांपेक्षा जास्त आगीचे धूमशान संपत नाही तोच बुधवारी चार घटना घडल्याने आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाची चांगलीच दमछाक झाली होती.

बुधवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास वागळे इस्टेटमधील काळूबाई कचरा स्पॉट या ठिकाणी कचऱ्याला आग लागली होती. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान वाहनासह दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. दुसरी आगीची घटना सकाळी साडेअकराच्या सुमारास वागळे इस्टेट या ठिकाणी लकी स्टार गॅरेजच्या इलेक्ट्रिक बॅटरीला आग लागली होती. आगीची तिसरी घटना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास नौपाडा येथील मँगो इलेक्ट्रॉनिक स्टोअर समोर असलेल्या महावितरणच्या डीपीला आग लागली होती. महावितरण कंपनीचे कर्मचारी, तसेच अग्निशमन दलाचे जवान यांनी आग त्वरित विझवली. आगीची चौथी घटना ढोकाळीतील मोहन मिल कंपाऊंडजवळील शरदचंद्र पवार स्टेडिअमसमोर कचऱ्याला, तसेच बाजूला उभ्या असलेल्या चार भंगार गाड्यांना आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी पूर्णपणे आग विझवली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

Mouni Roy: एका दिवसात तीस गोळ्या अन् इंजेक्शन्स; तीन महिने अंथरुणाला खिळून होती मौनी रॉय, अशी झाली होती अवस्था

PBKS vs CSK : चेन्नई संघासमोर गोलंदाजीचे प्रश्नचिन्ह; मागील सामन्यात पराभव झालेल्या पंजाबविरुद्ध पुन्हा सामना

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT