मुंबई

मालमत्ता देयके आता पोस्टाद्वारे घरी

CD

वसई, ता. ३० (बातमीदार) : वसई-विरार शहरात सर्व मालमत्ताधारकांना वेळेत मालमत्ता कर देयके प्राप्त व्हावीत या हेतूने मालमत्ता कर देयके या वर्षी भारतीय पोस्ट विभागामार्फत मालमत्ताधारकांना वितरित करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. वसई-विरार महापालिका कराची देयके देण्यासाठी मालमत्ता विभागातील कर्मचाऱ्यांना घरोघरी पाठवत असते. त्यानंतर नागरिक कर भरण्यास पुढे येतात; मात्र या वर्षी पोस्टाच्या माध्यमातून देयके दिली जाणार आहेत. त्यामुळे थेट देयके मिळाल्याची नोंद होणार आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी सन २०२३-२४ या वर्षाची वित्तीय मालमत्ता कर देयके पाहण्याची तसेच डाऊनलोड करण्याची सुविधा महानगरपालिकेच्या www.vvcmc.in या सांकेतिक स्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. ज्या करदात्यांना मालमत्ता कराचा भरणा करायचा असेल त्यांनी ऑनलाईन पद्धतीने गुगल पे, फोन पे, पेटीएम, नेट बँकिंग माध्यमातून कर भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच मुदतीत मालमत्ता कर भरणा करणाऱ्या मालमत्ताधारकांना करातून ३० जूनपर्यंत विशेष सूट जाहीर करण्यात आली असल्याचे मालमत्ता कर संकलन विभागाने स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरमधून हेमंत सावरांना भाजपकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT