crime_ sakal
मुंबई

Mumbai : दिराकडून भावजयीचा विनयभंग

अरिहंत टॉवर माहीम, मुंबई येथे राहणाऱ्या दिलीप वडके व त्यांच्या भावाची नागोठणे येथे वडिलोपार्जित मालमत्ता आहे. या मालमत्तेवरून वडके कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद निर्माण झाला होता.

सकाळ वृत्तसेवा

रोहा - वडिलोपार्जित मालमत्तेविषयी प्रांत कार्यालयात दिवाणी दाव्याची सुनावणी झाल्यानंतर जिन्यावरून खाली उतरत असताना सख्ख्या दिराने ५० वर्षीय भावजयीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार तहसीलदार कार्यालयात घडला आहे. दिलीप वडके (वय ६७) असे आरोपीचे नाव आहे.

अरिहंत टॉवर माहीम, मुंबई येथे राहणाऱ्या दिलीप वडके व त्यांच्या भावाची नागोठणे येथे वडिलोपार्जित मालमत्ता आहे. या मालमत्तेवरून वडके कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद निर्माण झाला होता. या वादग्रस्त मालमत्तेविषयी रोहा प्रांत कार्यालयात दिवाणी दावा सुरू आहे. २७ एप्रिल रोजी दिवाणी दाव्याच्या अनुषंगाने दोन्ही पक्षकार प्रांत कार्यालयात हजर होते.

प्रांत कार्यालयातील सुनावणीविषयी कामकाज आटोपून फिर्यादी महिला आपल्या मुलीसमवेत जिन्यावरून खाली उतरत असताना आरोपी दिलीप वडके यांनी आपल्या भावजयीचा विनयभंग केला. त्याच वेळी पीडित महिलेने आरोपीला ढकलून विरोध केला असता त्याने रागाच्या भरात पीडित महिलेला मारहाण केली.

तसेच त्यांच्या मुलीलादेखील धक्काबुक्की करून दोघींना ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत रोहा पोलिस ठाण्यात विनयभंग व मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहे. पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक टी. एस. पारवे पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar record victory : सुनेत्रा पवार देशात सर्वाधिक मताधिक्य मिळवणाऱ्या ठरल्या आमदार, बारामतीचा आतापर्यंतचा निकाल घ्या जाणून

RCB ला मोठा धक्का! IPL 2026 सुरू असतानाच स्टार ओपनर अचानक इंग्लंडला झाला रवाना; नेमकं काय घडलं?

Kerala Election 2026 Results : केरळमध्ये १० वर्षांनंतर सत्तांतर, आता मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष; 'ही' २ नावे चर्चेत

Assembly election results 2026 Live Update : ५ टप्प्यांच्या मतमोजणीनंतर ममता बॅनर्जी यांची २५,९४२ मतांसह मोठी आघाडी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना एकत्र मिळणार मार्च-एप्रिलचा हप्ता? महत्त्वाची अपडेट समोर...

SCROLL FOR NEXT