mva mva
मुंबई

Mumbai : पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार !

त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महाविकास आघाडीचे सरकार येऊन पुढचे मुख्यमंत्री अजित पवार असतील, असे विधान केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली - शिंदे-फडणवीस यांचे सरकार कोसळणार असून राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार येणार, असा विश्वास राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला. राज्याचे पुढचे मुख्यमंत्री अजित पवार असतील असेही त्यांनी सांगितले. कल्याण येथे एका कार्यक्रमानिमित्त आमदार मिटकरी आले होते. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महाविकास आघाडीचे सरकार येऊन पुढचे मुख्यमंत्री अजित पवार असतील, असे विधान केले आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्यातील सरकार कोसळणार आहे. एकनाथ शिंदे हे जास्त दिवस मुख्यमंत्री राहणार नाहीत. मी अंदाज बांधत नाही; मात्र संविधानाचा जितका अभ्यास केला त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाला संविधानाच्या कक्षेच्या बाहेर जाता येऊ शकत नाही.

त्यामुळे हे सरकार अपात्र होऊन महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. अजित पवार असे नेते आहेत, की त्यांचा फोन बंद असला तरी अनेक लोकांचे पित्त खवळते. त्यांचा फोन बंद असल्याने त्यांच्यावर चर्चा होते, हाच त्यांचा मोठेपणा आहे. दादांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे मी आजही सांगतो, की महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री अजित पवार असतील, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas Iyer: श्रेयस अय्यर आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळाडूंशी संवाद साधण्यास उत्सुक; जपानविरुद्ध ऐतिहासिक टी-२० सामन्याचीही उत्सुकता

ED Raid Karnataka: जारकीहोळींच्या घरी ‘सार्वजनिक’ची कागदपत्रे अन् लाखोंचे परदेशी चलन; ईडीच्या छाप्यात काय काय आढळलं?

बाप तो बाप रहेगा! बाईबद्दल विधान शिंदेंच्या आमदाराला भोवणार, मध्यरात्री गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : खंबाटकी घाटातील नवीन बोगद्यातून वाहतूक सुरू; एकेरी मार्गामुळे आज वाहनांची मोठी कोंडी

Indian Army Success Story: १३ वेळा अपयश, पण जिद्द कायम! १४व्या प्रयत्नात अनिकेत झाला भारतीय सैन्यात लेफ्टनंट, अपयशाला हरवत यशाला गवसणीचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT