Crime News esakal
मुंबई

Mumbai : अंमली पदार्थासह त्रिकुटाला अटक

तिघेजण अमली पदार्थ विक्री करणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली.

सकाळ वृत्तसेवा

ठाणे - मेफेड्रोन या अमली पदार्थाची ग्राहकांना विक्री करण्यासाठी आलेल्या तीन आरोपींना मेफेड्रोनसह वागळे इस्टेट पोलिस पथकाने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून २४० ग्रॅम मेफेड्रोन पावडरसह रोख रक्कम, मोबाईल फोन, दोन दुचाकी असा १४ लाख सात हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तिघेजण अमली पदार्थ विक्री करणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली.

सापळा रचून पोलिस पथकाने आरोपी अमर अशोक तुसामकर (वय २९) रा. साठेनगर वाल्मीकीपाडा, वागळे इस्टेट ठाणे, मोहसिन शफिक शेख (वय ३४) रा. किसननगर नं. २, वागळे इस्टेट ठाणे व निहाजुल सत्तार सय्यद (वय ३४) रा. किसननगर नं. ३, वागळे इस्टेट ठाणे या तिघांना बेड्या ठोकल्या.

तपासणीत गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी, रोख रक्कम आणि २४० ग्रॅम एमडी पावडर, मोबाईल असा १४ लाख सात हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. न्यायालयाने तिघांना २ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके यांनी दिली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक भूषण एच. शिंदे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले, पण घरी परतलेच नाहीत; शिवाजी पार्कात ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Puttu Recipe: इडली पात्रात बनवा चविष्ट 'पुट्टू'! केरळच्या घराघरांत बनणारा पौष्टिक पदार्थ; पाहा सोपी रेसिपी...

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

SCROLL FOR NEXT