Mantralaya sakal media
मुंबई

Mumbai : विकास कामांमध्ये राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग अग्रस्थानी

देशात रेल्वेचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. रेल्वे वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी फाटक बसवण्यात आले आहे. इतर वाहनांची वाहतूक सुरळीत होण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

पालघर - देशातील विविध राज्यांतील बांधकाम विभागापेक्षा महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभाग विकास कामांमध्ये अग्रस्थानी असल्याचे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. बांधकाम भवनाच्या नूतन इमारतीचे, तसेच रेल्वे फाटक क्र. ४७ अ कोळगाव येथील उड्डाणपुलाचे लोकार्पण चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते.

देशात रेल्वेचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. रेल्वे वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी फाटक बसवण्यात आले आहे. इतर वाहनांची वाहतूक सुरळीत होण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात आले. कोळगावातील उड्डाणपुलामुळे वाहतुकीची समस्या मिटणार आहे. देशामध्ये दिवसाला ३६ किलोमीटर लांबीचा रस्ता तयार होत आहे. नवीन रस्ते निर्माण करण्यासाठी भूसंपादन करणे आवश्यक असते.

स्थानिकांना विश्‍वासात घेऊन भूसंपादन करावे. विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी राज्य सरकार निधी कमी पडू देणार नाही. नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकल्प येत्या काळात पूर्ण करणार असल्याचा विश्वास पालकमंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला.

या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार राजेंद्र गावित, सर्वश्री आमदार श्रीनिवास वनगा, सुनील भुसारा, राजेश पाटील, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Update: महाराष्ट्रात धोक्याची घंटा! पुढील २४ तासांत ३१ जिल्ह्यांना वादळ-पावसाचा तडाखा, IMD चा मोठा इशारा

Latest Marathi News Live Update : पुढील चार दिवस राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता

Amit Thackeray: मनसेचे अमित ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर, मोहोळ तालुक्यातील गारपीटग्रस्त पिकांची पाहणी, मुख्यमंत्र्यांकडे करणार नुकसानभरपाईची मागणी!

आमदार यड्रावकरांचे ३१ लाखांचे बील थकीत तरी महावितरणचा कानाडोळा, ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे कनेक्शन तोडलं; 'स्वाभिमानी'चा गंभीर आरोप

Gachiroli News: गडचिरोलीत वैशाखापूर्वीच वाढला उन्हाचा पारा; भर दुपारी रस्ते सुनसान; उन्हाच्या तिव्रतेमुळे आत्तापासूनच अनेकजण हैराण

SCROLL FOR NEXT