मुंबई

आंबेडकरांच्या उपस्थितीतील शिवजयंती

CD

बदलापूर, ता. २ (बातमीदार) ः बुधवारचा (ता. ३) दिवस हा बदलापूरसाठी ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. याच दिवशी ९६ वर्षांपूर्वी म्हणजे ३ मे १९२७ रोजी बदलापुरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली होती आणि या जयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. या ऐतिहासिक घटनेचे स्मरण बदलापूरकरांकडून केले जात आहे.

३ मे १९२७ रोजी शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी करण्यात आली होती. जयंती साजरी करण्यासाठी उत्सव समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचे व्यवस्थापक पालये शास्त्री हे होते. पालये शास्त्रींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे उत्सवाच्या अध्यक्षस्थानी असावेत असा प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव गावकऱ्यांनी एकमुखाने मान्य केला. त्यानंतर पालये यांनी ब्राह्मण व ब्राह्मणेतर पत्राचे संपादक रा. नाईक यांच्यामार्फत आंबेडकरांशी संपर्क केला. त्यांना भेटून शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारण्याची विनंती केली. ही विनंती अर्थातच आंबेडकरांनी मान्य केली होती. त्यानंतर आंबेडकर या कार्यक्रमास उपस्थित राहिले. हा दिवस बदलापूरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा होता, अशी भावना येथील नागरिक व्यक्त करतात.

-----------------
१५ हजार लोकांची उपस्थिती
डॉ. आंबेडकर आपले सहकारी सीताराम शिवतरकर, गणपत जाधव यांच्यासह आले होते. येथील नानासाहेब चाफेकर यांच्या घरी त्यांचा मुक्काम होता. सायंकाळी ६ वाजता आंबेडकर उत्सवाच्या ठिकाणी उपस्थित राहिले. पालये शास्त्री यांनी प्रास्ताविक भाषण केले. नंतर नानासाहेब चाफेकर यांनी आंबेडकरांनी अध्यक्षस्थान स्वीकारण्याची विनंती केली. याला काळे, सुळे, पाटील व मोकाशी यांनी अनुमोदन दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात शिवाजी महाराजांच्या निरनिराळ्या गुणवैशिष्ट्यांवर अत्यंत परिणामकारक असे भाषण केले. यानंतर रात्री कीर्तन झाले. यानंतर शिवाजी महाराजांची पालखी डॉ. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली १५ हजार लोकांसह नगर प्रदक्षिणा करून आल्यावर हा उत्सव समाप्त झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

Mouni Roy: एका दिवसात तीस गोळ्या अन् इंजेक्शन्स; तीन महिने अंथरुणाला खिळून होती मौनी रॉय, अशी झाली होती अवस्था

PBKS vs CSK : चेन्नई संघासमोर गोलंदाजीचे प्रश्नचिन्ह; मागील सामन्यात पराभव झालेल्या पंजाबविरुद्ध पुन्हा सामना

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT