मुंबई

तपासणीस थांबवणाऱ्या आरटीओला धडक

CD

पनवेल, ता. ३ (वार्ताहर) : तपासणीसाठी कार थांबवलेल्या मोटार वाहन निरीक्षकाला धडक देऊन कारचालकाने पलायन केल्याचा प्रकार समोर आला आहे. यात वाहन निरीक्षक मानसिंग खाडे (वय ४५) हे किरकोळ जखमी झाले आहेत. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून कारचालकाचा शोध सुरू आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्ग व जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्याकरीता परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई यांच्या विशेष तपासणी मोहिमेंतर्गत आरटीओचे वायुवेग पथक तयार करण्यात आले आहेत. वायुवेग पथक क्रं.२ मध्ये मोटार वाहन निरीक्षक मानसिंग खाडे व सहायक मोटार वाहन निरीक्षक निखिल जमदाडे यांना नेमण्यात आले आहे. त्यामुळे १ मे रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास खाडे व जमदाडे हे आपल्या चालकासह गस्त घालत पनवेल येथील जुन्या मुंबई-पुणे मार्गावरील शेडुंग टोलनाका येथे गेले हेते. त्यावेळी त्यांनी एका कारचालकाला थांबण्याचा इशारा केला, पण चालकाने कार न थांबवता निरीक्षकाला धडक देत पलायन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT