मुंबई

अश्विनी भिडेंकडून मेट्रो ३ च्या स्थानकाची पाहणी

CD

मुंबई, ता. ६ : मुंबई मेट्रो ३चे काम प्रगतिपथावर असून त्यांपैकी पहिल्या टप्प्याचे काम ८७ टक्के पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील ७६.८ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. संपूर्ण मेट्रो ३ प्रकल्पाचे एकूण ८१ टक्के काम पूर्ण झाले आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी नुकताच कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.

मुंबई मेट्रो ३चा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ अखेर मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रो ३ चे काम वेगाने सुरू आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, मेट्रो ३ च्या पहिल्या टप्प्यात आरे ते बीकेसीचे ८७ टक्के काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात बीकेसी ते कफ परेडचे ७६ टक्के काम पूर्ण झाले आहे. स्थानकांच्या उभारणीचे कामही सध्या अंतिम टप्प्यात आहे. कामाच्या प्रगतीचा आढावा नुकताच अश्विनी भिडे यांनी अधिकाऱ्यांसमवेत घेतला. मरोळ नाका आणि एमआयडीसी स्थानकांना भेट देऊन त्यांनी कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. पाहणीदरम्यान स्थापत्य विभागाचे कार्यकारी संचालक सी. एम. जाधव, सिग्नलिंग आणि दूरसंचार कार्यकारी संचालक राजीव कुमार आणि विद्युत विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक प्रफुल्ल वाघ त्यांच्यासोबत सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

Mouni Roy: एका दिवसात तीस गोळ्या अन् इंजेक्शन्स; तीन महिने अंथरुणाला खिळून होती मौनी रॉय, अशी झाली होती अवस्था

PBKS vs CSK : चेन्नई संघासमोर गोलंदाजीचे प्रश्नचिन्ह; मागील सामन्यात पराभव झालेल्या पंजाबविरुद्ध पुन्हा सामना

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT