मुंबई

उल्हासनगरच्या रस्त्यांच रुपडे पालटणार

CD

उल्हासनगर, ता. ११ (वार्ताहर) : शहरातील डांबरीकरणाचे आणि ओबडधोबड झालेल्या रस्त्यांना हद्दपार करून त्यांच्या जागी एमएमआरडीएच्या १५० कोटींच्या निधीतून काँक्रीटीकरणाचे सात रस्ते तयार करण्यात येत आहेत. त्यापैकी पाच रस्त्यांच्या कामाचा शासकीय भूमिपूजन सोहळा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते नुकताच पार पडला आहे. त्यामुळे उल्हासनगरचे रुपडे या काँक्रीटच्या रस्त्यांनी पालटणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात वेगवान विकासाला गवसणी घातली आहे. अशातच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या मागणीनुसार एमएमआरडीएने सात रस्त्यांसाठी १५० कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. त्यापैकी नेताजी चौक ते कैलाश कॉलनी, न्यू इंग्लिश हायस्कूल ते हिललाईन पोलिस ठाणे, ए ब्लॉक ते साईबाबा मंदिर, सोनार चौक ते कोयंडे पुतळा, शामाप्रसाद मुखर्जी चौक ते शांतीनगर या पाच रस्त्यांचा शासकीय भूमिपूजन सोहळा डॉ. शिंदे यांच्या हस्ते पार पडला आहे. या वेळी आमदार कुमार आयलानी, डॉ. बालाजी किणीकर, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त डॉ. करूणा जुईकर, जमीर लेंगरेकर, शहर अभियंता प्रशांत सोळंके, उपजिल्हाप्रमुख अरुण आशान, राजेंद्र चौधरी, राजेंद्रसिंह भुल्लर, रमेश चव्हाण, नाना बागूल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष जमनू पुरस्वानी, साई पक्षाचे जीवन ईदनानी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संदीप जाधव, अश्विनी आहुजा यांच्यासह शिवसेना आणि भाजपाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
....
शहरात पुनर्विकास धोरण
वाहनचालकांसाठी पर्वणी ठरणाऱ्या या रस्त्यांची कामे वेगाने सुरू करण्यात येणार आहेत. तसेच शहरामधील इतर विकासकामांना मार्गी लागण्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावला आहे. शहरात पुनर्विकासाचे धोरण अवलंबिले जात आहे. यामुळे लाखो रहिवाशांना दिलासा मिळणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT