मुंबई

पटनिगिरे यांना कारणे दाखवा नोटीस

CD

नवी मुंबई, ता. १४ (वार्ताहर) : सक्षम प्राधिकारी असलेल्या महापालिका आयुक्तांच्या अधिकाराचा दुरुपयोग करून त्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय परस्पर बदली करणारे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अंबरीश पटनिगीरे यांना अखेर महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. केलेली बदली रद्द करण्यासाठी वरिष्ठांनी पाच लाखांची लाच मागितल्याप्रकरणी महापालिकेचा कनिष्ठ अभियंता रितेश पुरव याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले आहे.
उपायुक्त अंबरीश पटनिगीरे यांचे सदरील वर्तन कार्यालयीन शिस्तीस धरून नसून त्यांनी महाराष्ट्र नागरी सेवेचा भंग केला आहे. या गैरवर्तनाकरिता तुमच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही का प्रस्तावित करण्यात येऊ नये, याचा खुलासा महापालिका आयुक्तांकडे तीन दिवसांत सादर करण्याचे नोटिशीत म्हटले आहे. आयुक्तांनी बजावलेल्या या नोटिशीमुळे अंबरीश पटनिगीरे यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचे बोलले जात आहे.
महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांची बदली आणि पदस्थापना (जबाबदारी) देण्याचे अधिकार हे सक्षम प्राधिकारी म्हणून आयुक्तांचे आहेत. महापालिकेच्या शहर अभियंता विभागात कार्यरत असलेले कनिष्ठ अभियंता रितेश पुरव यांची बी-नेरूळ विभाग कार्यालयात आयुक्तांच्या आदेशानुसार बदली करण्यात आली होती; परंतु बदलीचे कोणतेही अधिकार नसताना उपायुक्त अंबरीश पटनिगीरे यांनी रितेश पुरव यांची बी विभाग कार्यालय नेरूळ येथून मुख्यालयातील अतिक्रमण विभाग कार्यालयात नियुक्ती केली होती. उपायुक्तांनी केलेली बदली रद्द करण्यासाठी रितेश पुरव यांच्याकडे वरिष्ठांकरिता पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी लिपिक दिनेश सोनवणे यांच्यामार्फत करण्यात आली होती. वरिष्ठांकरिता सदर लाच स्वीकारताना परिमंडळ -२ कोपरखैरणे येथील लिपिक दिनेश सोनवणे यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT