मुंबई

चार रोड परिसर लवकरच पुरमुक्त

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : सायन ते शिवडी दरम्यान असणारा चार रोड परिसर तसेच वडाळयातील बॉम्बे पोर्ट ट्रस्ट परिसर पुरमुक्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. यासाठी या परिसरातील पर्जन्य जलवाहिन्यांचे वृद्धिकरण करण्याचा निर्णय महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाने घेतला आहे. पालिका यासाठी सुमारे ४५ कोटी रुपये खर्च करणार आहे.
शहर विभागातील परिमंडळ-२ मधील एफ उत्तर विभागातील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अधिकार क्षेत्रातील वडाळा रोड रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील बाजूस व एल. एम. नाडकर्णी मार्ग येथे सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या पर्जन्य जलवाहिन्या अतिवृष्टीच्या वेळी पावसाचा प्रवाह वाहून नेण्यास अपुर्‌या पडत आहेत. त्यामुळे वडाळा रोड रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूस आर. ए. किडवाई रोड आणि वडाळा स्थानक या परिसरात पावसाळ्यात अतिवृष्टीच्या वेळी पाणी साचते. या परिसरात पाणी साचू नये म्हणून वडाळा स्थानकाच्या पूर्व बाजूकडील पर्जन्य जलवाहिन्यांचे वृध्दीकरण करणे अत्यंत आवश्यक ठरले आहे. या कामामुळे वडाळा रोड रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूस आर. ए. किडवाई रोड आणि वडाळा स्टेशन या परिसरात पावसाळ्यात उद्भवणारी पूरसदृश्य परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत होणार आहे.

आराखडा तयार
पर्जन्य जलवाहिन्यांचे वृद्धिकरण कामाचा आराखडा तयार करण्यात आला असून निविदा प्रक्रिया ही पर्जन्य जलवाहिन्या खात्यामार्फत तयार करण्यात आली आहे. तसेच या कामाचे तपशीलवार अंदाजपत्रक ही तयार करण्यात आले असून सदर कामाकरिता ४० कोटी ८५ लाख इतक्या रक्कमेचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.

ई-निविदांना प्रतिसाद
पर्जन्य जलवाहिन्यांचे वृद्धिकरण कामासाठी ई-निविदा मागविण्यात आल्या आहेत. त्यास ६ निविदाकारांनी प्रतिसाद दिला आहे. यात मेसर्स विरल असोसिएटस्, मेसर्स ऍक्युट डिझाईन,मेसर्स मेनदिप एंटरप्रायजेस, मैसर्स पी.बी. कंन्स्ट्रक्शन कंपनी, मेसर्स हायटेक इंजिनियर्स आणि मेसर्स योगेश कंन्स्ट्रक्शन या कंपन्यांचा समावेश आहे. या सर्व निविदाकारांच्या निविदा प्रतिसादात्मक आढळून आल्या.

यांना मिळू शकते काम
मेसर्स विरल असोसिएटस् यांनी लघुत्तम दर सादर केल्याने त्यांना हे काम देण्याची शिफारस पालिकेकडून करण्यात आली आहे. या कामामध्ये पर्जन्य जलवाहीनी प्रणालीतील ढापा ड्रेनचे रूपांतरण, विद्यमान पाईप ड्रेन्सचे विस्तारीकरण, आकारमान वाढविणे, नवीन आर.सी.सी. पाईप ड्रेन्स पुरविणे व टाकणे आणि जलभरावाच्या ठिकाणी पुरसदृश्य परिस्थितीचा जोर कमी करण्याकरीता इतर जलवाहीन्यांची कामे करणे यांचा समावेश आहे. या कामासाठी पालिका ४५ कोटी ९८ लाख रुपये खर्च करणार असून प्रशासकीय मंजुरीसाठी सध्या हा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे.

पालिकेची दक्षता
पालिकेकडून हे काम अतिशय दक्ष राहून केले जाणार आहे. हे काम सुरू करण्यापूर्वी, काम चालू असताना व काम पार पाडल्यानंतर कामाच्या जागेचे फोटो काढण्यात येतील व ते महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठे नेते, छगन भुजबळांचा टोला

SCROLL FOR NEXT