मुंबई

महामार्ग पोलीस विभाग कात टाकणार

CD

महामार्ग पोलिस विभाग कात टाकणार
नवनियुक्त अपर पोलिस महासंचालकांनी दाखवला विश्वास

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : राज्यातील प्रत्येक रस्त्यांवरील अपघातांवर बारीक अभ्यास करून माहिती संकलित करून त्यावर उपाययोजना करण्याचे काम महामार्ग पोलिसांकडून केले जाते. शिवाय महामार्गावरील वाहतूक व्यवस्था चोख बजावली जात असून, नव्याने समृद्धी महामार्गाच्या सुरक्षेचे आव्हानसुद्धा महामार्ग पोलिसांपुढे निर्माण झाले आहे. अशा सर्व आव्हानांना पेलण्यासाठी महामार्ग पोलिस विभाग तयार आहे.

महामार्ग पोलिसांच्या माध्यमातून महामार्गालगत असलेल्या गावांमध्ये जनजागृती मोहीम राबवली जात असून, नागरिकांच्या सूचना, प्रतिक्रिया मिळवण्यासाठी समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करणार असल्याचे नवनियुक्त अपर पोलिस महासंचालक रवींद्र सिंघल यांनी सांगितले आहे.
पत्रकारांशी बोलताना त्यांनी मुंबई शहर, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, समृद्धी महामार्गासह इतरही राज्यातील महामार्गांवरील अपघातांची माहिती दिली. शिवाय सध्या महामार्ग पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबद्दलही त्‍यांनी या वेळी सांगितले.
महामार्ग पोलिसांना वायरलेस करण्याचे कामसुद्धा येथून पुढे केले जाणार असून, मनुष्यबळ, साहित्य, वाहन आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करून अपघात आणि अपघाती मृत्यू रोखण्यासाठी प्रभावी काम केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जागरूक नागरिकांनी सूचना कराव्यात
महामार्ग पोलिस विभागाचे आतापर्यंत समाजमाध्यमांवर कोणतेही खाते नव्हते; मात्र नागरिकांशी जुळण्यासाठी आणि महामार्गांशी संबंधित माहिती नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी महामार्ग पोलिस विभागाने ‘हायवे पोलिस महाराष्ट्र’ या नावाने फेसबुक आणि ‘एचएसपीमहाराष्ट्र’ या नावाने ट्विटर हँन्डलची सुरुवात केली असून, यावर नागरिकांनी सूचना करण्याचे आवाहनसुद्धा करण्यात आले आहे.

राज्यातील महामार्गावरील समस्यांची माहिती घेणे सुरू असून, बेकायदा पार्किंग, लेन कटिंग अशा काही समस्या त्यामध्ये दिसून येत आहेत. एकूणच संपूर्ण समस्यांचा आढावा येथून पुढे घेतला जाणार असून, मृत्युंजय दूतसुद्धा वाढवण्याचा विचार आहे. त्याशिवाय वाहतुकदार संघटनांनासुद्धा वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासंदर्भात लवकरच पत्र पाठवले जाणार आहे.
- रवींद्र सिंघल, अपर पोलिस महासंचालक (वाहतूक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरमधून हेमंत सावरांना भाजपकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT