मुंबई

दरडग्रस्त भागांवर पालिकेचा वॅाच

CD

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २२ ः नवी मुंबई महापालिका क्षेत्रात पावसाळापूर्व कामांच्या तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अशा परिस्थितीत दरडग्रस्त आणि धोकादायक भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे स्थलांतर करण्याचे आदेश पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.
आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे महापालिका क्षेत्रातील १५ संभाव्य ठिकाणांची यादी प्राप्त झाली आहे. त्यामधील रमेश मेटल कॉरी परिसराला भेट देऊन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. यावेळी पावसाळा सुरू होण्यापूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. तसेच सर्व विभाग कार्यालयांतील दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. याप्रसंगी एमआयडीसी क्षेत्रात नेरूळ डी ब्लॉकमध्ये सुरू असलेल्या रस्ते काँक्रिटीकरण कामांचीही पाहणी नार्वेकर यांनी केली असून पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्याचे निर्देश अभियांत्रिकी विभागाला दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

Mouni Roy: एका दिवसात तीस गोळ्या अन् इंजेक्शन्स; तीन महिने अंथरुणाला खिळून होती मौनी रॉय, अशी झाली होती अवस्था

PBKS vs CSK : चेन्नई संघासमोर गोलंदाजीचे प्रश्नचिन्ह; मागील सामन्यात पराभव झालेल्या पंजाबविरुद्ध पुन्हा सामना

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT