Mumbai sakal
मुंबई

Mumbai : यंदा पावसाळ्यात ५२ दिवस भरतीचे प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

आपत्कालीन व्यवस्थापन योजनेचा भाग म्हणून पावसाळ्यातील चार मीटरपेक्षा मोठ्या भरतीचे दिवस जाहीर

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : यंदाच्या पावसाळ्यातील ५२ दिवस हे मोठ्या भरतीचे असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. या काळात अतिवृष्टी झाल्यास सखल भागात पाणी साठण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून या पार्श्वभूमीवर महापालिका यंत्रणा सतर्क ठेवली जाणार आहे. नागरिकांनीही या भरतीच्या दिवसाची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

आपत्कालीन व्यवस्थापन योजनेचा भाग म्हणून पावसाळ्यातील चार मीटरपेक्षा मोठ्या भरतीचे दिवस जाहीर करण्यात येतात. यंदा जून ते सप्टेंबर या काळात ५२ दिवस मोठ्या भरतीचे आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त जी. जी. गोदेपूरे यांनी दिली. यामध्ये जून महिन्यात १३ दिवस, जुलै महिन्यात १४ दिवस, ऑगस्ट महिन्यात १४ दिवस, तर सप्टेंबर महिन्यात ११ दिवस असे ५२ दिवस मोठ्या भरतीचे आहेत.

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने भरतीचे हे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मोठ्या भरतीच्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिकेद्वारे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाद्वारे करण्यात आले आहे.
भरतीचे दिवस
जून : ३, ४, ५, ६, ७, ८, ९, १७, १८, १९, २०, २१, २२
जुलै : २, ३, ४, ५, ६, ७, ८, १७, १८, १९, २०, २१, २२, ३१
ऑगस्ट : १, २, ३, ४, ५, ६, १६, १७, १८, १९, २०, २९, ३०, ३१
सप्टेंबर : १, २, ३, ३, १५, १६, २७, २८, २९, ३०, ३०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना; पबला लागलेल्या आगीत 27 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT