मुंबई

पेब किल्ल्यावर हौदात पडलेल्या गायीला जीवदान

CD

नेरळ ता. २८ (बातमीदार) ः माथेरान जवळ असलेल्या पेब किल्ल्यावर पाण्याच्या हौदात एक गाय पडली होती. याबाबत माहिती मिळताच नेरळ येथील शिवभक्त तरुण, माथेरान सह्याद्री रेस्क्यू पथकाने अंधारात मदतकार्य केल्‍याने गायीला जीवदान मिळाले. दरम्यान तरुणांनी दाखवलेल्या भूतदयेबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
सह्याद्रीच्या डोंगररांगेतील पेब किल्ल्यावर असलेल्या पाण्याच्या साठवण टाकीत एक गाय पडल्याची माहिती शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळा, अपघातग्रस्तांचा मदतीसाठी ग्रुप यांना मिळाली. त्‍यांनी नेरळ गावातील काही तरुणांसह घटनास्‍थळी दाखल होत गायीला हौदातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्‍न सुरू केले. यात माथेरानमधील सह्याद्री बचाव पथकानेही सहभाग घेतला. गायीला हौदातून बाहेर काढण्यासाठी काहीजण हौदात उतरले, त्‍यानंतर दोराच्या साहाय्याने तरुणांनी गायीला बाहेर काढण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: PM मोदी अन् फडणवीसांमुळे डेव्हिड हेडलीचे स्टेटमेंट घेऊ शकलो, उज्ज्वल निकमांचा खुलासा

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आईही मैदानात

SCROLL FOR NEXT