MBBS admission
MBBS admission sakal
मुंबई

Mumbai : एमबीबीएसच्या विद्यार्थिनीचा विनयभंग; यापूर्वी देखील आरोपी प्राचार्याने अशाच पद्धतीने तरुणीची...

सकाळ वृत्तसेवा

कासा - एमबीबीएसच्या परीक्षेत पास व्हायचे असेल तर मला हवे ते दे, असे सांगून विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या प्राचार्याविरोधात कासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डहाणू तालुक्यातील महामार्गाजवळ धुंदलवाडी येथे वेदांत मेडिकल कॉलेज आहे. मुलींच्या हॉस्टेलमधील हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

फिर्याद देणारी २१ वर्षीय विद्यार्थिनी ही मुळची नागपूर येथील असून ती एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे.
यापूर्वीदेखील आरोपी प्राचार्याने अशाच पद्धतीने या तरुणीची फोनवरून आणि प्रत्यक्ष छेड काढली असून यासंदर्भात या पीडित विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या प्रशासनाला लेखी तक्रारदेखील केली होती; मात्र त्या वेळीदेखील त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती पीडित विद्यार्थिनीने आपल्या फिर्यादीत दिली आहे.

विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीनंतर कासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या सगळ्या घटनेनंतर डहाणूच्या वेदांत वैद्यकीय महाविद्यालयातील हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकारांमुळे विद्यार्थिनींच्या तसेच पालकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: पीयूष चावलाच्या फिरकीची जादू चालली, हेडपाठोपाठ क्लासेनलाही केलं क्लिन-बोल्ड; हैदराबादचा निम्मा संघ गारद

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT