मुंबई

मुलुंडमधील कामगार रुग्‍णालयाचे आधुनिकीकरण

CD

मुलुंड, ता. २९ (बातमीदार) ः मुलुंडमधील ई. एस. आय. एस. अर्थात कामगार रुग्णालयात रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, यासाठी खासदार मनोज कोटक सतत प्रयत्नशील होते. यासाठी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत सरकारने कामगार रुग्णालयाच्या नूतनीकरण आणि आधुनिकीकरणास मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे या रुग्णालय परिसरात अत्याधुनिक वैद्यकीय आणि नर्सिंग महाविद्यालय उभारण्याचा प्रस्तावही मान्य करण्यात आला आहे. त्यामुळे ईशान्य मुंबईकरांना भविष्यात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असल्‍याचे बालले जात आहे.
कामगार रुग्णालयासंदर्भात झालेल्या बैठकीला केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे, खासदार मनोज कोटक, मुख्य सचिव मनोज सौनिक, कामगार विभागाचे अग्रसचिव विनिता वैद सिनगल, पर्यावरण विभागाचे अग्रसचिव प्रवीण दराडे आणि विविध शासकीय समित्या व विविध कामगार संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

लवकरच प्रकिया सुरू
खासदार मनोज कोटक म्हणाले, की आवश्यक प्रक्रिया येत्या काही महिन्यांत पूर्ण केली जाईल आणि केंद्र सरकारकडून मुलुंडच्या कामगार रुग्णालयाच्या आधुनिकीकरणाचे काम सुरू केले जाईल. रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्‍याचे कोटक यांनी सांगितले. तसेच या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोटक यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT