मुंबई

पावसाळ्यातील आव्हानांसाठी अदाणी इलेक्ट्रिसिटी सज्ज

CD

मुंबई, ता. ३ ः येत्या पावसाळ्यात ग्राहकांच्या सुरक्षिततेसह अखंड वीजपुरवठ्यासाठी अदाणी इलेक्ट्रिसिटीने विविध उपाय योजले आहेत. जून महिन्यापासून केंद्रीय आपत्कालीन नियंत्रण केंद्र (सीडीसीसी) कार्यान्वित करण्यात आले आहे. प्रत्यक्ष स्थळावरील अधिकारी आणि नियंत्रण केंद्रात विविध माध्यमांतून सातत्याने संवाद साधण्यात येणार आहे. आवश्यक उपकरणे, आपत्कालीन प्रतिसाद नौका आणि वाहने तसेच आपत्कालीन पुरवठा डीजी संच आणि विविध ठिकाणी पाण्याचा उपसा करणारे पंपही सज्ज आहेत, अशी माहिती अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या प्रवक्त्याने दिली.

वीजग्राहकांच्या मदतीसाठी सतत सुरू राहणारा सहाय्य क्रमांक १९१२२ आणि केंद्रीय आपत्कालीन नियंत्रण क्रमांक (जून ते सप्टेंबर पर्यंत) ०२२०५०५४९११/५०५४७२२५ सुरू करण्यात आला आहे. मिसकॉल सुविधा, एसएमएस, व्हॉट्सअ‍ॅप, संकेतस्थळ, मोबाईल आणि समाजमाध्यम मंच ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. तक्रार नोंदणीसाठी किंवा वीज पुनर्पुरवठ्याबाबतची स्थिती जाणून घेण्यासाठी १८००५३२९९९८ वर ग्राहक आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून मिसकॉल देऊ शकतात.

व्हॉट्सॲपद्वारे तक्रार नोंदवण्यासाठी किंवा वीज पुनर्पुरवठ्याबाबतची स्थिती जाणून घेण्यासाठी Power< नऊ आकडी खाते क्रमांक > असा संदेश ९५९४५१९१२२ वर पाठवता येणार आहे. संकेतस्थळ ः www.adanielectricity.com.

ग्राहकांसाठी सल्ले
- अखंडित वीजपुरवठा आणि सुरक्षिततेसाठी इलेक्ट्रिकल मीटर केबिन आणि विद्युत उपकरणांचे पावसापासून संरक्षण करा.
- स्विच आणि प्लग सॉकेटसारखे नादुरुस्त इलेक्ट्रिकल साहित्य बदला.
- वीजवाहिन्या किंवा बटण आदींना ओल्या हातांनी स्पर्श करू नका.
- मीटर केबिन, पथदिवे किंवा वितरण खांबामध्ये ठिणग्या दिसल्यास त्यांना स्पर्श करू नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरमधून हेमंत सावरांना भाजपकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT