Mumbai Environmentally Friendly Gas
Mumbai Environmentally Friendly Gas sakal
मुंबई

Mumbai Environmentally Friendly Gas : कचऱ्यातून पर्यावरणपूरक गॅसची निर्मिती

सुजित गायकवाड

Mumbai Environmentally Friendly Gas - तुर्भे येथील क्षेपणभूमीची क्षमता संपत आल्याने महापालिकेतर्फे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी लवकरच नवीन प्रकल्प सुरू केला जाणार आहे. यासाठीची पावले महापालिकेने उचलली असून कचऱ्यावर माती टाकून खतनिर्मिती करण्याऐवजी थेट पर्यावरणपूरक गॅसनिर्मिती होणार आहे.

नवी मुंबई शहरातून दररोज ८०० मेट्रिक टन कचरा तुर्भेच्या कचराभूमीवर गोळा होतो. या कचऱ्यातून प्लास्टिकच्या वस्तू आणि खाऊची आवरणे, सॅनिटरी नॅपकिन, लहान व ज्येष्ठांचे पॅड, थर्माकोल आदी कचऱ्याचे वर्गीकरण केल्यावर ३०० ते ३५० टन ओला कचरा शिल्लक राहतो. वर्गीकरणानंतर शिल्लक राहिलेल्या या कचऱ्यावर नंतर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जाते,

परंतु ओल्या कचऱ्यातील काही वस्तू पूर्णपणे नष्ट होण्यास बराच कालावधी लागत असल्यामुळे तुर्भेच्या जागेवर सध्या कचऱ्याचा मोठा डोंगर उभा राहत आहे. या कचऱ्यातून वीजनिर्मितीबरोरच गॅसपासून इतर पर्यायी वापर करण्याचे तंत्रज्ञान बाजारात उपलब्ध झाले आहे. त्यानुसार पालिकेने मिथेन वायूची निर्मिती करून त्याचा वापर वाहन चालवण्यासाठी केला जाऊ शकतो का, याची चाचपणी सुरू केली आहे. याच अनुषंगाने तुर्भे क्षेपणभूमीवर ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायोमिथनायझेशन प्रकल्प उभारणे प्रस्तावित केले आहे.

अनेक राज्यांमध्ये प्रकल्पाला यश
नवी मुंबई शहराच्या आधी गोवा, चंडीगड, वाराणसी आणि इंदूर अशा शहरांनी कचऱ्यापासून तयार होणाऱ्या गॅसचे प्रकल्प राबवले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व प्रकल्प यशस्वी ठरले आहेत. महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या सर्व प्रकल्पांना भेटी देऊन अभ्यास केल्यानंतर आता नवी मुंबईत हा प्रकल्प राबवला जात आहे.

प्रकल्पामुळे होणारे फायदे
- कचऱ्यापासून गॅसची निर्मिती करणाऱ्या प्रकल्पात पैशांची गुंतवणूक करण्याऐवजी प्रकल्पाच्या उभारणीकरिता जागा उपलब्ध करून देण्याची भूमिका नवी मुंबई महापालिकेने घेतली आहे. महापालिकेची भांडवली खर्चासोबत कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी येणाऱ्या ३० कोटींची बचत होणार आहे.
- तुर्भे कचराभूमीची सुमारे ६६ एकरची जागा आता संपत आली आहे. नवीन प्रकल्पासाठी महापालिकेला ३७ एकर जागेची गरज आहे. त्यानुसार महापालिकेने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे जागेची मागणी केली आहे. सध्या बंद अवस्थेत असलेल्या दगडखाणींच्या जागेला महापालिकेने प्राधान्य दिले आहे.

कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावताना त्यापासून गॅस निर्मितीचा प्रकल्प राबवणे महापालिकेच्या विचाराधीन आहे. कॉम्प्रेस गॅस निर्मितीचा पर्याय काही कंपन्यांनी महापालिकेला दिलेल्या सादरीकरणातून सुचवला आहे. त्यानुसार लवकरच निविदा मागवणार आहोत.
- राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: डोंबिवलीत ईव्हीएम मशीन पडले बंद

IPL 2024 Playoffs : प्लेऑफसाठी नाही कोणत्या राखीव दिवस; पावसामुळे खेळखंडोबा झाला तर कसा लागणार निकाल?

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

SCROLL FOR NEXT