मुंबई

डेव्हिड ससून ग्रंथालयाला नवी झळाळी

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : सुमारे दीडशे वर्षांचा इतिहास आणि दुर्मिळ ग्रंथसंपदा असलेल्या जगातील ४८ हेरिटेज ग्रंथालयांपैकी एक असलेल्या मुंबईतील डेव्हिड ससून ग्रंथालयाचा वास्तूच्या जीर्णोद्वाराचे काम सुमारे १६ महिन्यांनंतर पूर्ण झाले आहे. आठवडाभरात किरकोळ कामे पूर्ण करून हे ग्रंथालय वाचकांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती ग्रंथालय प्रशासनाने ‘सकाळ’ला दिली.
काळा घोडा परिसरात १८७० मध्ये डेव्हिड ससून ग्रंथालयाची इमारत बांधण्यात आली. ग्रंथालयाच्या इमारतीचा आराखडा स्कॉट मॅकलॅड अ‍ॅण्ड कंपनीने तयार केला, तर वास्तुकलेची रचना जे. कॅम्पबेल आणि गॉसलिंग अँड कॅम्पबेल यांनी केली. ही संपूर्ण इमारत गॉथिक शैलीमध्ये उभारण्यात आली आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी मालाड स्टोन आणि चुनखडीचा वापर करण्यात आला होता. या इमारतीच्या दर्शनी भागात जुन्या काळातील घड्याळ आहे. आजही या घड्याळाला दर सहा दिवसांनी चावी द्यावी लागते. ही हेरिटेज वास्तू पाहण्यासाठीही अनेक पर्यटक ग्रंथालयाला भेट देतात. २००६ मध्ये जगातील अप्रतिम ४७ ग्रंथालयांमध्ये डेव्हिड ससून ग्रंथालयाची नोंद झाली आहे. याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या जागतिक वारसा यादीत या इमारतीचा समावेश करण्यात आला आहे. या ऐतिहासिक ग्रंथालयाकडे पर्यटकांचा, पुस्तकप्रेमींचा आणि चित्रपट निर्मात्यांचा ओघ वाढावा, यासाठी काही सामाजिक संस्थांच्या मदतीने या इमारतीला नवी झळाळी देण्याचे काम १ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू करण्यात आले होते.
...
जीर्णोद्वाराचे काम पूर्ण
तब्बल सोळा महिन्यानंतर म्हणजे मे २०२३ मध्ये ग्रंथालयाचा वास्तूच्या जीर्णोद्वाराचे काम पूर्ण झाले आहे. सध्या ग्रंथालयातील किरकोळ कामे करण्यात येत आहेत. त्यानंतर ग्रंथालय वाचकांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती डेव्हिड ससून ग्रंथालय प्रशासनाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejas Fighter Jet Crash: वडील युट्यूबवर एअर शोचे व्हिडिओ स्क्रोल करत होते... तेवढ्यात विंग कमांडर मुलाच्या मृत्यूची बातमी कळली

Latest Marathi News Live Update : राज्यात थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

Ind vs SA 2nd Test : रिषभ पंतच्या नेतृत्वाची 'टेस्ट'! आजपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना, मायदेशातील प्रतिष्ठा पुन्हा पणास

Pune Book Festival : पुणे पुस्तक महोत्सवाचा श्रीगणेशा; फर्ग्युसनच्या मैदानावर १३ ते २१ डिसेंबरपर्यंत साहित्य मेळा

बाबो ही तर सेम आलियाचं दिसते! ऊत सिनेमातील आर्या सावे म्हणाली, 'पण माझी आवडती अभिनेत्री...'

SCROLL FOR NEXT