मुंबई

भगव्यासह 'गुलाबी' वादळाचे आघाडी समोर आव्हान; KCR यांच्या पक्षविस्ताराच्या कार्यपध्दतीमुळे मविआच्या मतांना धोका?

CD

मुंबई: कट्टरपंथी हिंदुत्ववादी विचारांचे वादळ महाराष्ट्रात उठवण्यासाठी भारतीय जनता पक्ष सर्वतोपरी तयारी करत आहे. अशात तेलंगणातील सत्ताधारी भारत राष्ट्र समिती हा पक्षदेखील राज्यात निवडणूक लढवण्यासाठी शड्डू ठोकून उभा आहे. त्यामुळे के. चंद्रशेखर राव यांच्या ‘गुलाब’ वादळाचे आव्हान महाविकास आघाडीसमोर उभे असल्याचा सूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत उमटला.

भारत राष्ट्र समितीने मागील सहा महिन्यांपासून महाराष्ट्रात गावोगावी संघटन वाढवण्यासाठी जबरदस्त ताकद लावली आहे. तेलंगणा राज्यात बीआरएसच्या सरकारने दलित आणि मुस्लिम समुदायासाठी राबवलेल्या योजनांचा प्रचार मोठ्या प्रमाणात केला जात आहे.

मराठवाडा आणि विदर्भातील सीमावर्ती भागातील नेते आणि कार्यकर्त्यांना बीआरएसमध्ये प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे बीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव महाराष्ट्रात मोठे आव्हान उभे करत असल्याचे मत राष्ट्रवादीच्या आमदारांनी व्यक्त केले.

केसीआर यांच्या पक्षविस्ताराच्या या कार्यपध्दतीमुळे महाविकास आघाडीच्या मतांना धोका असल्याची भूमिका या वेळी मांडण्यात आली. त्यामुळे आगामी निवडणुकांना सामोरे जाताना बीआरएसच्या गुलाबी झेंड्याला कमी लेखून चालणार नाही, असे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना वाटत आहे.

प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेवर शंका
या बैठकीत बीआरएस सोबतच वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेबाबतही काही आमदारांनी शंका घेतली. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती झालेली असताना प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट देणे हा योगायोग नसून मविआला राजकीय कोंडीत पकडण्याचा अजेंडा असल्याची भूमिका काही आमदारांनी व्यक्त केली.

भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबादमध्ये वास्तव्य केले. महाविद्यालय उभारले; पण ते कधीही औरंगजेबाच्या कबरीवर गेले नाहीत; मात्र सध्याच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकीय परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर तिथे जातात, हाच मोठा प्रश्न असल्याची खंत काही आमदारांनी व्यक्त केली.

नूतन कार्याध्यक्षांची पहिलीच बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्षपद स्वीकारल्यानंतर खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत आज पहिल्यांदाच पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक झाली. या वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT