Eknath Shinde ESAKAL
मुंबई

Eknath Shinde: 'मुख्यमंत्री शिंदे हे शिवसैनिक नसून भाजप सैनिक' ठाकरे गटाच्या नेत्याचं खरमरीत ट्विट

CD

ठाणे: तुम्ही बाळासाहेबांचे सैनिक नसून भाजप सैनिक आहात. स्वतःला शिवसैनिक म्हणवता आणि ज्या शिवसेनेच्या ताब्यात मुंबई महापालिका होती, तिचीच चौकशी लावता? तुमची नाटके बाळासाहेब बघत असतील, असे खरमरीत ट्विट ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून केले आहे.

हिंमत असेल, तर मुख्यमंत्र्यांनी नागपूर महापालिका आणि ठाणे महापालिकेची एसआयटी चौकशी लावावी, असे आव्हान संजय घाडीगावकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

मुंबई महापालिकेवर भगवा फडकवून बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला मुंबईत मानसन्मान मिळवून दिला. मुंबईच्या विकासाची अनेक कामे केली. मुंबई महापालिका फायद्यात आणून देत बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांच्या हिताचे काम केले.

मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यात शिवसेनेचा वाटा महत्त्वाचा आहे. गेली अनेक वर्षे मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात राहिल्याने मुंबईची प्रगती झाली.

मुंबईची शैक्षणिक सुविधा, आरोग्य सुविधा, रस्ते विकास व इतर अनेक उपक्रम हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत, असे असताना केवळ भाजपच्या इशाऱ्यावर भाजपचे सैनिक असणारे मुख्यमंत्री यांनी बाळासाहेबांच्या काळापासून ताब्यात असणाऱ्या मुंबई महापालिकेची राजकारणासाठी चौकशी लावली आहे.

मुख्यमंत्री हे शिवसैनिक असते, तर त्यांनी गेली अनेक वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असणाऱ्या मुंबई महापालिकेची चौकशी लावली असती का, असा सवाल करत मुख्यमंत्री हे भाजप सैनिक झाल्यानेच भाजपच्या इशाऱ्यावर त्यांनी मुंबई महापालिकेची चौकशी लावली असल्याचा घणाघात टीका घाडीगावकर यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; विसर्जन मिरवणुकीमुळे पीएमपी बसच्या मार्ग आणि स्थानकांत बदल, हे आहेत पर्यायी मार्ग

Bank News :ग्राहकांसाठी रविवारी बँका सुरू; २८ ते ३० सप्टेंबरच्या संपाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Nanded Farmers: ‘काजू-बदाम खा, पण शेतकऱ्यांना न्याय द्या’; अर्धापुरात काँग्रेसचा जनाक्रोश, घंटानाद करून दुष्काळ जाहीर

मुंबईकरांचा प्रवास सुसाट! ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भुयारी मार्गासह 'ठाणे-बोरिवली'साठी दुय्यम कर्ज; सरकारचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : पुण्यात विसर्जन सोहळ्यासाठी महापालिकेची तयारी

SCROLL FOR NEXT